जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन; NCB प्रमुखांचा दावा

आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन; NCB प्रमुखांचा दावा

आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन; NCB प्रमुखांचा दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (rhea chakraborty) अटकेनंतर NCB च्या तपासाला वेग आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 सप्टेंबर :  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) हत्या प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासाता अभिनेत्री  रिया चक्रवर्तीला एनसीबी (NCB) ने अटक केली आहे. मात्र रियाचं ड्रग्ज कनेक्शन मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतापुरतं मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे. असा दावा एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांनी केला आहे. एनसीबी या प्रकरणात वेगाने पुढे जाते आहे. ड्रग्जशी संबंधित अनेकांना पकडलं आहे आणि यापेक्षा मोठी कारवाई होऊ शकते, असं राकेश अस्थाना यांनी आऊटलूक मासिकाशी बोलताना सांगितलं. राकेश अस्थाना म्हणाले, “रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज सिंडिकेट छोटं नाही आहे. या प्रकरणाचा मोठ्या ड्रग्ज रॅकेटबाबत माहिती मिळाली आहे. जे दुबई आणि दहशतवादी गट असे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जोडलेले आहे. रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज आणलं जायचं आणि त्या पैशांचा वापर नार्को टेररसाठी केला जातो. क्युरेटेड मारियुआना या ड्रगची बाजारात किंमत 8 लाख रुपये प्रतिकिलो इतकी आहे” हे वाचा -  सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश, 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण “या पूर्ण प्रकरणात रियाच्या सहभागाबाबत आम्ही इतकंच सांगू शकतो की तिच्यासारथ्या लोकांना माफ करू शकत नाही. हे सर्व तरुणांसाठी एक रोल मॉडेलप्रमाणे आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्ज पार्ट्यांबाबत माहिती जाली आहे आणि आम्ही याबाबत ठोस पुरावे जमा केल्यानंतरच कारवाई करू”, असंही राकेश म्हणाले. हे वाचा -  या आठवड्यात कोण असेल NCB च्या निशाण्यावर; सारा आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी? या प्रकरणात आतापर्यंत रिया चक्रवर्तीला, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यालादेखील अटक करण्यात आली आहे. रियाने या प्रकरणात बॉलिवूडमधील 25 जणांची नावं सांगिली आहे. त्यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात