टेलिव्हिजन जगतातील काही चेहरे दीर्घकाळासाठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अभिनेत्री रश्मी देसाई अशा चेहऱ्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर रश्मी खूप सक्रीय असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
तिचे विविध फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतात. रश्मीचा सिझलिंग अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. यावेळीही तिने असेच काही फोटो पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
या फोटोमध्ये रश्मी पिवळसर रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने केस देखील एकदम कुरळे केले आहेत तर त्यावर फुलांचा टियारा देखील घातला आहे. तिची ही हॉट पोज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
रश्मीने या फोटोला देलेले कॅप्शन देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये तिने Feeling heroic feeling moana असे म्हटले आहे(फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
तिने या फोटोंची सीरिज अपलोड करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. तिच्या या फोटोवर 6000 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. तर 1.7 लाखांहून अधिकांनी हे फोटो लाइक केले आहेत. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)
रश्मीने 'उतरन' मालिकेपासून तिची ओळख बनवण्यास सुरुवात केली. यानंतर बिग बॉस या शो ने तिला विशेष प्रसिद्धी दिली. घराघरात रश्मी देसाई हा चेहरा पोहोचला (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)