Home /News /entertainment /

सोशल मीडियानंतर आता मुंबईतील रस्त्यांवर #justiceforsushant चे पोस्टर्स, VIDEOS आले समोर

सोशल मीडियानंतर आता मुंबईतील रस्त्यांवर #justiceforsushant चे पोस्टर्स, VIDEOS आले समोर

मुंबईतील विविध भागात #justiceforsushant चे बोर्ड लावण्यात आले आहेत. हे बोर्ड्स कुणी लावले हे याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे.

    मुंबई, 26 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे 14 जून 2020 रोजी निधन झाले. त्याच्या मुंबईतील वांद्रे याठिकणी  असणाऱ्या घरामध्ये त्याचा मृतदेह सापडला होता. दरम्यान त्याच्या मृत्यूनंतर हत्या की आत्महत्या याबाबत देखील तर्कवितर्क लावण्यात आले. अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. ईडी, सीबीआय आणि एनसीबी विविध अँगल्सने या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सोशल मीडियावर याप्रकरणाचा तपास करण्यात होत असलेल्या दिरंगाईवरून युजर्सकडून ताशेरे ओढले जात आहे. विविध ट्रेंड देखील सोशल मीडियावर चालवण्यात आले. सुशांतला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली. #justiceforsushant, #cbiforsushant असे हॅशटॅग असलेल्या पोस्ट अनेकांनी शेअर केला. सुशांतचे चाहते, त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार या ऑनलाइन मोहिमांमध्ये सहभागी झाले होते. (हे वाचा-अभिनेत्रीने व्यक्त केली तिच्या हत्येची शंका,म्हणाली-मी छताला लटकलेली आढळले तर...) दरम्यान आता या मोहिमांचे पडसाद मुंबईच्या रस्त्यावर देखील उमटू लागले आहेत. मुंबईतील विविध भागात #justiceforsushant चे बोर्ड लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स कुणी लावले हे याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही आहे. निनावी पोस्टर्स असल्याने त्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावर असे लिहले आहे की, 'मी तुमच्यापैकीच एक होतो. तुम्ही न्यायासाठी पात्र आहात? तसाच मी देखील आहे #justiceforsushant' सुशांतच्या विस्तारित कुटुंबाकडून हा संदेश देण्यात आल्याचे बोर्डवर लिहले आहे. दरम्यान त्याचे विस्तारित कुटुंब म्हणजे त्याचे चाहते असू शकतात असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (हे वाचा-दीपिकाच्या चौकशीदरम्यान उपस्थित राहणार रणवीर सिंह? परवानगीसाठी NCBकडे केला अर्ज) दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर समोर आलेले ड्रग कनेक्शन संपूर्ण बॉलिवूडला विळखा घालू लागले आहे. यामध्ये काही मोठी नावं समोर येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) याप्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) या बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. यापैकी दीपिकाची चौकशी आज 10 वाजता होणार आहे तर श्रद्धा-सारा चौकशीकरता 11 वाजता एनसीबी कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या