मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Drishyam 2 च्या बंपर यशानंतर लवकरच येणार 'दृश्यम 3'; दिग्दर्शकानं दिली मोठी हिंट

Drishyam 2 च्या बंपर यशानंतर लवकरच येणार 'दृश्यम 3'; दिग्दर्शकानं दिली मोठी हिंट

दृश्यम 2

दृश्यम 2

दृश्यमच्या पहिल्या भागांनंतर दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. आता दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी मोठी घोषणा केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 25 नोव्हेंबर :बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 'दृश्यम 2' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन केले. दिवसेंदिवस चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक गल्ला कमवत आहे. 'दृश्यम 2' या चित्रपटाने अवघ्या 7 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. दृश्यम 2 च्या नॉनस्टॉप कमाईचा वेग काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं पहायला मिळतंय. दृश्यमच्या पहिल्या भागांनंतर दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. आता दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी मोठी घोषणा केली आहे.

अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. 'दृश्यम 2' चित्रपटाचे एकूण कलेक्शन 104.54 कोटी रुपये झाले आहे. विजय साळगावकर 7 वर्षांनंतर परतल्यानंतरही त्यांच्याबद्दलची एकेक गोष्ट चाहत्यांच्या लक्षात आहे. प्रेक्षक त्याला विसरलेले नाहीत. आता   प्रेक्षक चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडे तिचा तिसरा भाग बनवण्याची मागणी सातत्याने करत आहेत.

हेही वाचा - Jhalak Dikhhla Jaa 10: रुबिना गश्मीर नव्हे तर 'हा' स्पर्धक ठरला झलकचा विजेता; प्रेक्षकांनी दिली ही रिअॅक्शन

चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासून 'दृश्यम 3' हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'दृश्यम 2' चे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीत दिग्दर्शक अभिषेकने 'दृश्यम 3' बनवण्याबाबत सांगितले की, 'सध्या मी आणि माझी टीम 'दृश्यम 2'च्या यशाचा आनंद घेत आहोत. तिचा तिसरा भाग आणण्याची चाहत्यांची मागणी आहे आणि मी यावर नक्की काम करेन.

यापुढे अभिषेक पाठक म्हणाले कि, 'माझ्या टीमला आता थोडा वेळ आहे. येणाऱ्या काळात आपण काय करणार याचा विचार करेन. दृष्यम 2 पाहिल्यानंतर चाहत्यांनी दिलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचा मी आनंद घेत आहे.'' एवढेच नाही तर या मुलाखतीत अभिषेकने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही सांगितले आहे. तो म्हणाला, 'माझ्याकडे आधीच काही स्क्रिप्ट्स आहेत. चाहत्यांसाठी पुढे काय आणायचे याचा विचार करत आहे. मला यावर माझा विचार करायचा आहे कारण दृष्यम 2 सारखा चित्रपट दिल्यानंतर मला अशी कथा प्रेक्षकांसमोर मांडावी लागेल जी त्याच्या तोडीस तोड असेल आणि  जी लोकांना खूप आवडेल.''

दिग्दर्शकांनी केलेल्या या घोषणेमुळे आता प्रेक्षक दृष्यम च्या पुढच्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दृश्यम 2' या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू, रजत कपूर, इशिता दत्ता आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसंच नेहा जोशी आणि सिद्धार्थ बोडके सारखे मराठी कलाकार देखील या चित्रपटात झळकले आहे. या चित्रपटात सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं सगळीकडे  कौतुक होत आहे.

First published:

Tags: Ajay devgan, Bollywood actor, Bollywood News, Entertainment