रात्रीस खेळ चाले : शेवंतानं घराला लावलं कुलूप, कारण...

रात्रीस खेळ चाले : शेवंतानं घराला लावलं कुलूप, कारण...

Ratris Khel Chale - रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंता आणि अण्णांमध्ये दुरावा येतोय

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : रात्रीस खेळ चाले मालिका बऱ्यापैकी बघितली जाते. विशेषत: अण्णा आणि शेवंताचा ट्रॅक लोकांना आवडतोय. आतापर्यंत शेवंता आणि अण्णा यांचं प्रेम रंगताना आपण पाहिलं. पण आता उलट चित्र दिसणार आहे.

शेवंता अण्णांना टाळायला बघतेय. तिला हे नातं नको आहे. पण अण्णा काही तिचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. शेवंता आपल्या नवऱ्याला म्हणजे पाटणकरांना ऑफिसला जाताना कुलूप लावून जा म्हणून सांगते. याचं पाटणकरांनाही आश्चर्य वाटतंय. पण अण्णा येऊ नयेत म्हणून ती हे करतेय.

जयाच्या अगोदर दिल्लीच्या 'या' मुलीवर जडला होता अमिताभ यांचा जीव

पाटणकर घराला कुलूप लावून निघतात पण चावी शोभाकडे देऊन जातात. योगायोगानं ते ही गोष्ट अण्णानाच सांगतात. अगदी शोभाकडे चावी असल्याचंही. त्यामुळे या आठवड्यात अण्णा आणि शेवंता यांच्यात तू तू मै मै होणार आहे.

TRP मीटर : प्रेक्षकांचा कौल कायम, 'या' मालिकेनं मारली बाजी

Loading...

दरम्यान,अण्णांनी वच्छीवर बंदूक चालवली आणि शोभा मध्ये आली. तिला गोळी लागली. अण्णा तुरुंगात गेले. पण अण्णांच्या बाजूनं शोभानं साक्ष दिली. शोभानं सांगितलं, गोळी चुकून लागली. त्यामुळे अण्णा तुरुंगातून बाहेर पडले.

इकडे वच्छी सुनेवर भडकलीय. सुनेनं-शोभानं अण्णांच्या बाजूनं साक्ष दिली म्हणून तिला भयंकर राग आलाय. ती तिला घराबाहेर काढण्याचंही ठरवते. पण शेवटी तिचं मन बदलतं.

लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला अनवाणी पोहोचली दीपिका पदुकोण

शोभा पुन्हा वाड्यात येते. ती अण्णांच्या समोर येते. त्यामुळे माई चिंतेत पडतात. सरिताला तर शोभा पुन्हा वाड्यावर नकोच असते. पण अण्णा तिला वाड्यात काम करायला ये, म्हणून सांगतात. त्यांच्या या निर्णयानं सगळ्यांना धक्का बसतो. आता पुढच्या काही भागांमध्ये शोभा वाड्यात अगदी मोकळेपणानं काम करणार. मुद्दाम अण्णांच्या पुढे पुढे करणार आणि वाड्यातल्या काही वस्तूही चोरणं, सुरू ठेवणार.

न्यूज18 लोकमतच्या स्टुडिओत बोधनकर यांच्या कुंचल्यातून गणराया LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...