Home /News /entertainment /

आर्थिक तंगीमुळे अभिनेत्यावर आली फळं विकायची वेळ, आयुष्मानसोबत केलं आहे काम

आर्थिक तंगीमुळे अभिनेत्यावर आली फळं विकायची वेळ, आयुष्मानसोबत केलं आहे काम

आयुष्मान खुरानासोबत काम केलेल्या अभिनेत्यावर आता घर चालवण्यासाठी रस्त्यावर उभं राहून फळं विकायची वेळ आली आहे.

    मुंबई, 19 मे : चीनच्या वूहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं आता संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं. ज्याचा फटका सर्वांना बसला आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्यांच्या सिनेमांचं शूटिंग रखडलं आहे. पण यासोबतच छोट्या-मोठ्या भूमिका साकरणाऱ्या कलाकारांना मात्र या लॉकडाऊनमुळे आर्थिक तंगीचा सामान करावा लागत आहे. एवढंच नाही तर आयुष्मान खुरानासोबत काम केलेल्या एका अभिनेत्यावर आता घर चालवण्यासाठी रस्त्यावर उभं राहून फळं विकायची वेळ आली आहे. आयुष्मान खुरानाच्या सिनेमा ड्रीम गर्ल आणि सोनचिडीया या सिनेमात काम करणारा अभिनेता सोलंकी दिवाकरला लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक तंगीचा फटका बसला आहे. या अभिनेत्याला त्यांच्या नावानं फार कमी लोक ओळखत असले तरीही त्याच्या भूमिका मात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण लॉकडाऊनमुळे या अभिनेत्याचं कामच बंद झाल्यानं आता घर चालवण्यासाठी तो दिल्लीच्या रस्त्यांवर फळं विकतोय. एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्यानं सांगितलं, लॉकडाऊमुळे माझं काम बंद झालं असलं तरी मला घरं चालवायचं आहे, घराचं भाडं द्यायचं आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मी आता फळं विकायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. मी ऋषी कपूर यांच्या एका सिनेमात छोटीशी भूमिका साकारत होतो. पण आता काम बंद आहे आणि ऋषी कपूर यांनीही जगाचा निरोप घेतला आहे. आग्रा येथे राहणारे सोलंकी मागच्या 25 वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्यांनी सांगितलं की, मी यासाठी सकाळी लवकर उठतो की इथल्या ओखला मंडई पर्यंत जाऊन मी फळं विकू शकेन. ही दिल्लीतील सर्वात मोठी फळ मंडई आहे. अभिनयासोबतच माझं घर चालवण्यासाठी इतरही वेगवेगळी काम करत असल्याचं या अभिनेत्यानं स्पष्ट केलं. संजय दत्तची लेक त्रिशालानं शाहरुखसोबत केलं होतं फोटोशूट, आता समोर आले Photo अ‍ॅसिड अ‍ॅटॅकचा वादग्रस्त व्हिडीओ, TikTok स्टारवर भडकली पूजा भट पंकज कपूरकडून का घेतला घटस्फोट? शाहिदच्या आईनं 36 वर्षांनंतर सोडलं मौन
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Coronavirus

    पुढील बातम्या