मुंबई, 19 मे : अभिनेता संजय दत्तची मुलगी बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. मात्र सिनेमांपासून दूर असलेली त्रिशाला नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. खास करुन सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग असल्यानं तिचे फोटो बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतात. आताही ती अशाच फोटोंमुळे चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी त्रिशालानं शाहरुख खानसोबत एक फोटोशूट केलं होतं. ज्याचे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.
त्रिशालानं तिच्या इन्स्टाग्रामवर शाहरुख खानसोबतचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, हे फोटो कधी काढले मला नेमकं आठवत नाही. पण 90 व्या दशकाच्या सुरुवातीला काढले असावेत असं मला वाटतं. त्रिशालाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुखच्या एका इन्स्टाग्राम फॅन पेजवरुनही हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यात लहानगी त्रिशाला शाहरुखसोबत दिसत आहे.
त्रिशाला ही संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी आहे. सध्या त्रिशाला आपल्या आजीसोबत अमेरिकेत असून ती भारत आणि तिच्या इथल्या सर्व लोकांना खूप मिस करत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या आईसोबतचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता.
पंकज कपूरकडून का घेतला घटस्फोट? शाहिदच्या आईनं 36 वर्षांनंतर सोडलं मौन
वॉचमनची नोकरी करायचा हा बॉलिवूड सुपरस्टार, दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.