Home /News /entertainment /

पंकज कपूरकडून का घेतला घटस्फोट? शाहिदच्या आईनं 36 वर्षांनंतर सोडलं मौन

पंकज कपूरकडून का घेतला घटस्फोट? शाहिदच्या आईनं 36 वर्षांनंतर सोडलं मौन

शाहिद कपूरची आई नीलिमा अझीम आणि पंकज कपूर 36 वर्षांपूर्वी वेगळे झाले. पण आता नीलिमा यांनी त्यांच्या घटस्फोटावर पहिल्यांदा मौन सोडलं आहे.

    मुंबई, 19 मे : लग्न हे एक असं नातं आहे जे संपलं तरीही त्याच्या आठवणी मात्र कायम राहतात. सुखद जाणीवेतून सुरू झालेलं हे नातं जेव्हा तुटतं तेव्हा अनेक कटू आठवणी कायमस्वरुपी देऊन जात. या नात्याची सुरुवात होते तेव्हा यात प्रेम, त्याग, सन्मान, आपलेपणा सर्व गोष्टी असतात. पण जेव्हा या गोष्टी कमी होत जातात तेव्हा हे नातं सुद्धा संपत. बॉलिवूडमध्ये अशा बिघडलेल्या नात्यांच्या कथा कमी नाहीत. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याची आई नीलिमा अझीम आणि पंकज कपूर हे दोघंही अशाच प्रकारे 36 वर्षांपूर्वी वेगळे झाले. या 36 वर्षांत नीलिमा दोन लग्न करून आयुष्यात पुढे गेल्या. पण आता त्यांनी पंकज कपूरकडून घेतलेल्या घटस्फोटावर पहिल्यांदा मौन सोडलं आहे. शाहिदची आई नीलिमा अझीम ही पंकज कपूर यांची पहिली पत्नी. नुकत्याच एक मुलाखतीत त्या घटस्फोट आणि त्यानंतर एक सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ या सर्व गोष्टींवर बोलल्या. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत नीलिमा म्हणाल्या, मला पंकजपासून वेगळं व्हायचं नव्हतं. पण ते त्यांच्या आयुष्यात खूप पुढे गेले होते आणि मला ते पचवणं कठीण जात होतं. त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं कारण होतं. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मी अवघ्या 15 वर्षांची होते आणि शाहिदच्या जन्मानंतर 3 वर्षांनी आम्ही दोघंही वेगळे झालो. नीलिमा म्हणाल्या, वेगळं होण्यासाठी पंकजकडे चांगलं कारण होतं आणि मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आमचा घटस्फोट आमच्या दोघांसाठीही खूपच कष्टाचा होता. पण आम्ही आतून पूर्णपणे तुटलो होतो. पण आज सर्वकाही ठिक आहे. ते त्यांच्या फॅमिलीसोबत आनंदात आहेत आणि मी नेहमीच त्यांचं चांगलं व्हावं अशी इच्छा व्यक्त करते. अखेर सोनाली कुलकर्णीने वाढदिवसालाच दिली ती गोड बातमी, फोटोही केला शेअर या मुलाखतीत नीलिमा यांना त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, 3 वर्षांच्या शाहिदला घेऊन वेगळं होणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. पण माझे मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीनं मी त्यातून बाहेर पडले. अर्थात हे सर्व करताना माझा बराच वेळ गेला. पण मी यातून बाहेर पडू शकले कारण त्यावेळी शाहिद माझ्यासोबत होता. तो नेहमीच माझी ताकद बनला. जसा काळ पुढे सरकत गेला तसा त्यानं प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला. नीलिमापासून वेगळं झाल्यानंतर पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठकशी दुसरं लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. मुलाचं नाव रुहान कपूर तर मुलीच नाव सना कपूर आहे आणि तिनं शानदार सिनेमात काम केलं आहे. तर नीलिमा यांनी सुद्धा 1991 मध्ये राजेश खट्टर यांच्याशी लग्न केलं पण इशानच्या जन्मानंतर 2001 मध्ये हे दोघं वेगळे झाले. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी रजा अली खान यांच्याशी लग्न केलं. त्यांचं हे लग्न सुद्धा फार काळ टिकलं नाही. 2009 मध्ये दोघंही वेगळे झाले. नवाझुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस; पत्नी आलियाने लावले गंभीर आरोप शिल्पा शेट्टीच्या 7 वर्षीय मुलाचं दमदार बॅक फ्लिप, स्टंट हिरोंनाही टाकलं मागे!
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Shahid kapoor

    पुढील बातम्या