Home /News /entertainment /

अ‍ॅसिड अ‍ॅटॅकचा वादग्रस्त व्हिडीओ, TikTok स्टारवर भडकली पूजा भट

अ‍ॅसिड अ‍ॅटॅकचा वादग्रस्त व्हिडीओ, TikTok स्टारवर भडकली पूजा भट

फैजल सिद्दीकी नावाच्या एका टिकटॉक युजरनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यावरुन त्याच्यावर अ‍ॅसिड अ‍ॅटॅकला प्रमोट केल्याचा आरोप केला जात आहे.

    मुंबई, 19 मे : मागच्या काही दिवसांपासून देशात टिकटॉक स्टार आणि युट्यूबर असा वाद रंगलेला दिसत असतानाचा आता आणखी एक वादग्रस्त टिकटॉक व्हिडीओमुळे गोंधळ उडाला आहे. फैजल सिद्दीकी नावाच्या एका टिकटॉक युजरनं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यावरुन त्याच्यावर अ‍ॅसिड अ‍ॅटॅकला प्रमोट केल्याचा आरोप केला जात आहे. फैजलच्या या व्हिडीओवरून अभिनेत्री पूजा भट भडकली असून तिनं ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. फैजल सिद्दीकीच्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत पूजानं ट्वीट केलं, इथल्या लोकांशी नक्की चुकीचं काय घडतंय. हे खूपच वाईट आहे. टिकटॉक इंडिया तुम्ही अशाप्रकारच्या कंटेंटला कशी काय परवानगी देऊ शकता. या माणसाला कामाला लावण्याची खूप गरज आहे आणि या व्हिडीओमध्ये जी मुलगी आहे तिला हे कळतंय का की ती अशा प्रकारच्या व्हिडीओ बनवून किती मोठं नुकसान करत आहे. वॉचमनची नोकरी करायचा हा बॉलिवूड सुपरस्टार, दोन वेळचं जेवण मिळणंही होतं कठीण या व्हिडीओत फैजल प्रेमात धोका मिळालेल्या मुलाचा अभिनय करताना दिसत आहे. तो एक मुलीला म्हणतो, त्याने तुला सोडून दिलं का ज्याच्यासाठी तू मला सोडलं होतं. यानंतर तो तिच्या चेहऱ्यावर काहीतरी फेकतो. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मुलीच्या चेहऱ्याचा मेकअप पाहता अ‍ॅसिड अ‍ॅटॅकमुळे तिचा चेहरा खराब झाला आहे असंच दिसतं. त्यामुळे या व्हिडीओमधून फैजल अ‍ॅसिड अ‍ॅटॅकला प्रमोट करत आहे असा आरोप त्याच्यावर सोशल मीडियावरून केला जात आहे. अर्थात हा सर्व गोंधळ झाल्यावर फैजलनं हा व्हिडीओ डिलिट केला आहे. अखेर सोनाली कुलकर्णीने वाढदिवसालाच दिली ती गोड बातमी, फोटोही केला शेअर फैजलच्या या व्हिडीओवरुन भाजप नेता तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी राष्ट्री महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे आणि त्यांनी हे प्रकरण पोलीस टिकटॉक इंडियाकडे घेऊन जाण्याचा वादा केला आहे. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना पत्र लिहून यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी टिकटॉक इंडियाकडेही फैजलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करण्याची मागणी केली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीला घटस्फोटाची नोटीस; पत्नी आलियाने लावले गंभीर आरोप
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Puja bhatt, Tiktok

    पुढील बातम्या