मुंबई, 13 ऑक्टोबर : सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओमुळं रानू मंडल एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये थेट प्लेबॅक सिंगर म्हणून संधी मिळाली. आताही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नवरात्रीमध्ये ड़ान्स करत असलेल्या या व्हिडिओमध्ये असेलली महिला रानू मंडलसारखीच दिसते. फक्त 8 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. त्यांनी सिंगर हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या सिनेमासाठी एका गाणं गायलं असून काही दिवसांपूर्वीच त्यांचं हे गाणं रिलीज झालं. त्यांना गाण्यासाठी अनेक ऑफरही येत आहेत. त्यानंतर आता रानू मंडल यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे.
आपल्या जादुई आवाजानं सर्वांना वेड लावणाऱ्या रानू मूळच्या पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणाऱ्या आहेत.रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू गात असेलेलं लता मंगेशकर यांचं ‘एक प्यार का नगमा’ हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला एतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यांनी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली. मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा VIDEO