VIDEO- सलमान म्हणतो, 'और हमे हमारी सायरा बानो मिल गयी'

सलमान आणि कतरिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री हीच जमेची बाजू आहे.

सलमान आणि कतरिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री हीच जमेची बाजू आहे.

  • Share this:
    मुंबई, 01 मे- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' सिनेमातलं दुसरं गाणं 'इश्क दी चाशनी' रिलीज झालं आहे. विशाल- शेखरचं संगीत असलेल्या या गाण्याला अभिजीत श्रीवास्तवने आपला आवाज दिला आहे. व्हिडीओबद्दल बोलायचे झाले तर, या गाण्यात सलमान आणि कतरिना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री हीच या गाण्याची सर्वात जमेची बाजू आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त उर्मिला मातोंडकरनं शेअर केले 'हे' फोटो विशेष म्हणजे गाण्याचे बोल आणि संगीतही फार श्रवणीय आहेत. मंगळवारी या गाण्याचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आज बुधवारी हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सलमानने सोशल मीडियावर हे गाणं शेअर केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांतच या गाण्याला हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले. MaharashtraDay : 'भाडिपा'चं 'जय महाराष्ट्र' गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग भारत सिनेमा यावर्षी ईदला अर्थात 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान २२ वर्षाच्या मुलापासून ते ७२ वर्षाच्या वयोवृद्ध माणलापर्यंतची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात सलमानचे सगळेच लुक दाखवण्यात आले आहेत. VIDEO: दीपिका पदुकोणचा 'बास्केटबॉल' मीडियावर व्हायरल; 'अशी' होती रणवीरची प्रतिक्रिया ३ मिनिट ११ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमा नक्की काय असणार आहे ते स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून सलमानची गोष्ट सुरू होते. सलमान सर्कसमध्ये ‘मौत का कुआ’त बाइक चालवताना दिसतो. दिशा पटानीही सर्कसमध्ये त्याच्यासोबत काम करताना दाखवण्यात आली आहे. यानंतर तो दुसरी नोकरी करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. इथे त्याची ओळख कतरिना कैफशी होते. इथे त्याला काम मिळतं. याचदरम्यान एक अशी घटना होते ज्यात सलमान भूतकाळात जातो. रणबीरशी झालेल्या ब्रेकअपवर कतरिना म्हणाली, ‘मला मित्रांपेक्षा आता शत्रूवर जास्त विश्वास आहे’ या फ्लॅशबॅकमध्ये जॅकी श्रॉफ दिसतो. जॅकीने सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका केली आहे. यानंतर सलमान मर्चंट नेवीच्या ड्रेसमध्ये दिसतो. शेवटी वाघा बॉर्डवरवरचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनचा फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. सलमान खानचा हा सिनेमा यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफ, सलमान खान, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
    First published: