मुंबई, 22 जून : सलमान खानच्या भारत सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री दिशा पाटनी सध्या तिचा आगामी सिनेमा ‘मलंग’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. भारत प्रमाणे या सिनेमातही दिशाचे काही स्टंट सीन आहेत. पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक दुर्घटना घडली असून यात दिशाला दुखापत झाली आहे. यानंतर दिशाला इंजेक्शन देण्यात आलं. याचा व्हिडिओदिशाच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला असून यात दिशाला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. VIDEO : एअरपोर्टवर गार्डनं दीपिकाकडे मागितलं आयकार्ड आणि… दिशाला इंजेक्शन देतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इंजेक्शन घेताना दिशा खूप त्रासलेली दिसत आहे. मात्र एवढं झाल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरील हसू कमी झालेलं नाही. शेवटी ती डॉक्टरना धन्यवाद देताना दिसत आहे. दिशाच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दिशासोबत ही दुर्घटना मलंग सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडली असल्याचं म्हटलं आहे. मात्र यानंतरही दिशानं शूट थांबवलं नाही पुढील शूटसाठी ती तयार असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे तिचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायचंय, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा
सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अशाप्रकारे जखमी होण्याची दिशाची पहिली वेळ नाही. याआधी ती भारतच्या शूटिंग दरम्यानही दिशा जखमी झाली होती आणि यातून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. याचा खुलासा तिने काही दिलसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. मलंग सिनेमामध्ये दिशा पाटनी पहिल्यांदाच अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय या सिनेमात सुपरस्टार अनिल कपूर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. सारा-कार्तिकमध्ये नक्की चाललंय तरी काय? मुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसले एकत्र
दिशा आणि आदित्य यांच्या प्रमुख भूमिका असलेला. मलंग 2020मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या भारत सिनेमात दिशाची छोटीशी भूमिका होती मात्र यातही त्यानं आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांवर सोडली. मात्र या सिनेमात कतरिना कैफसोबत काम करयला मिळालं नसल्याची खंत तिनं एका मुलाखतीत बोलून दाखवली होती.
========================================================== VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा ढाराढुर झोपले!