मुंबई, 22 जून : अभिनेत्री दीपिका पदुकोणनं काही दिवसांपूर्वीच तिचा आगामी सिनेमा 'छपाक'चं शूट पूर्ण केलं असून त्यानंतर ती ‘83’च्या शूटिंगसाठी लंडनाला रवाना झाली होती. पण आता ती लंडनहून भारतात परतली असून नुकतीच तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिच्यासोबत तिचे वडील प्रकाश पदुकोणही होते. दीपिका यावेळी ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसली. एअरपोर्ट एंट्री करताना तिथल्या गार्डनं दीपिकाला थांबवत तिच्याकडे आयकार्ड मागितलं. मात्र यावर दीपिकाची प्रतिक्रिया सर्वांना चकित करणारी होती.
कॅटरिनाने केला हॉट डान्स, VIDEO होतोय व्हायरल!
दीपिका एअरपोर्टच्या आत एंट्री करत असताना मागून गार्डनं तिला आयडीसाठी आवाज त्यावर दीपिका मागे वळली आणि त्याला विचारल, आयकार्ड हवं का? त्यानंतर ती मागे वळली आणि तिनं शांतपणे आपलं आयकाकार्ड दाखवलं आणि पुढे गेली. पण दीपिकाच्या या कृतीनं सर्वांची मनं जिंकली. तिच्या या वागण्यावरून तिला तिच्या स्टारडमचा अजिबात गर्व नसल्याचं दिसून आलं. तसं पाहायला गेलं तर दीपिका सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असली तरीही तिचे पाय अद्याप जमिनीवर आहेत. ती नेहीच सर्वांशी नम्रपणे वागताना दिसते. यावेळीही तिनं आपलं स्टारडमचा गर्व न करता शांतपणे आयकार्ड दाखवून पुढे गेली. दीपिकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सारा-कार्तिकमध्ये नक्की चाललंय तरी काय? मुंबई एअरपोर्टवर पुन्हा दिसले एकत्र
दीपिकाचा हा व्हिडिओ फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यावर दीपिकाचे चाहते तिचं कौतुक करत आहेत. पण यासोबतच त्या गार्डचं सुद्धा विशेष कौतुक केलं जात आहे ज्यानं एखाद्या सामान्य व्यक्तीला विचारावं तसं दीपिकाला आयकार्ड विचारलं.
बिपाशाच्या बोल्ड फोटोवर रणवीरची अशी कमेंट, दीपिकानं स्वप्नातही केला नसेल विचार
वर्क फ्रंट बोलायचं तर दीपिका लवकरच दीपिका मेघना गुलजारच्या छपाकमध्ये दिसणार आहे. या सिनेमामध्ये ती एका अॅसिड हल्ला पिडितेची भूमिका साकारत आहे. अभिनेता विक्रांत मेस्सी या सिनेमामध्ये दीपिकासोबत दिसणार आहे. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. याशिवाय ती रणवीर सोबत ‘83’मध्ये कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या दोघांचा एकत्र हा चौथा सिनेमा आहे.
View this post on Instagram
===========================================================
VIDEO : चौथ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या तरुणाला जवानाने जीवाची बाजी लावून वाचवलं