मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुख-भन्साळींची जोडी पुन्हा आली एकत्र; बॉलिवूडच्या बादशाहसाठी लिहिली खास कथा

शाहरुख-भन्साळींची जोडी पुन्हा आली एकत्र; बॉलिवूडच्या बादशाहसाठी लिहिली खास कथा

एक नवा चित्रपट घेऊन संजय लीला भंसाळी आणि शाहरुख खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळ जवळ दोन दशकांपूर्वी ही हीट जोडी एकत्र पहायला मिळाली होती.

एक नवा चित्रपट घेऊन संजय लीला भंसाळी आणि शाहरुख खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळ जवळ दोन दशकांपूर्वी ही हीट जोडी एकत्र पहायला मिळाली होती.

एक नवा चित्रपट घेऊन संजय लीला भंसाळी आणि शाहरुख खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळ जवळ दोन दशकांपूर्वी ही हीट जोडी एकत्र पहायला मिळाली होती.

  • Published by:  News Digital

मुंबई 9 मे : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) आणि अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan)  यांचं हिट समीकरण पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. अशी चर्चा सध्या बॉलिवूड मध्ये रंगली आहे. एक नवा चित्रपट घेऊन संजय लीला भंसाळी आणि शाहरुख खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जवळ जवळ दोन दशकांपूर्वी ही हीट जोडी एकत्र पहायला मिळाली होती.

‘देवदास’ (Devdas) या चित्रपटात भंसाळी आणि शाहरुख ने एकत्र काम केलं होत.त्यानंतर चित्रपटाचा इतिहास सगळेच जाणतात. चित्रपट बॉक्सऑफिसवर हीट ठरला होता. आजही या चित्रपटाची चर्चा होते. त्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक या जोडीला एकत्र पाहण्यास आतूर होते पण तसा योग कधीच जुळून आला नाही.

‘अभिनयात तू बिग बींपेक्षा सरस’; चाहत्याच्या कौतुकावर अभिषेक म्हणाला...

भंसाळी यांनी  सुपरहीट चित्रपटानंतर अनेदा शाहरुखशी नव्या चित्रपटांबद्दल बोलणी केली पण काहीनाकाही कारणांनी ते शक्य झालं नाही. तर ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ या भंसाळींच्या सुपरहीट चित्रपटांतही त्यांनी आधी शाहरुखला विचारणा केली होतीय पण शाहरुखने मात्र नकार दिल्याने हे दोन्ही चित्रपट रणवीर सिंगच्या पारड्यात पडले होते. भंसाळींना हम दिल दे चुके समन चा ही सिक्वेल काढण्याची इच्छा होती. तर शाहरुख आणि सलमाल ला ते एकत्र आणू इच्छित होते पण तेही काही कारणांनी शक्य झालं नव्हतं.

Khatron Ke Khiladi मध्ये झाली फिक्सिंग?; राखी सावंतनं आधीच सांगितलं विजेत्याचं नाव

तर आता भंन्साळी आता एका नव्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘इजहार’ असं या चित्रपटाचं नाव आहे. खूप आधी त्यांनी शाहरुख साठीच या चित्रपटाची कथा लिहिली होती. पण तेव्हा चित्रपट करणं शक्य नव्हतं. तर एका खऱ्या खुऱ्या प्रेमकथेवर हा चित्रपट आधारीत असल्याचं बोलंल जात आहे. एका भारतीय तरुणाने आपल्या नॉरव्हे येथील प्रेयसीला भेटण्यासाठी सायकल वरुन प्रवास केल्याची ही घटना होती. यावरच आधारीत हा चित्रपट असणार आहे.

शाहरुख स्क्रिप्टचं वाचन झाल्यानंतर चित्रपटासाठी होकार कळवणार आहे. त्यानंतर लगेच भंसाळी आणि शाहरुख चित्रपटाच्या कामाला सुरुवात करतील अशी माहिती समोर येत आहे. भंन्साळी सध्या त्यांच्या ‘हीरा मंडी’ या वेबसीरिच्या कामात व्यस्त आहेत. सोनाक्षी सिन्हा या सीरिज मध्ये झळकणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Sharukh khan