• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Khatron Ke Khiladi मध्ये झाली फिक्सिंग?; राखी सावंतनं आधीच सांगितलं विजेत्याचं नाव

Khatron Ke Khiladi मध्ये झाली फिक्सिंग?; राखी सावंतनं आधीच सांगितलं विजेत्याचं नाव

या शोचा विजेता निर्मात्यांनी आधीच ठरवला आहे असं चकित करणारा दावा राखी सावंतनं (Rakhi Sawant) केला. शिवाय तिनं या विजेत्याचं नाव देखील सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई 9 मे: ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) हा छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोचा 11 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर या शोचं चित्रीकरण वारंवार पुढे जात होतं. परंतु दिग्दर्शकांनी सर्व स्पर्धकांना दक्षिण आफ्रिकेला नेऊन शो पुर्ण करण्याचा घाट घातला आहे. परंतु त्यांची ही मेहनत पुर्णपणे वाया जाणार आहे. कारण या शोचा विजेता निर्मात्यांनी आधीच ठरवला आहे असं चकित करणारा दावा राखी सावंतनं (Rakhi Sawant) केला. शिवाय तिनं या विजेत्याचं नाव देखील सांगितलं आहे. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये जिंकण्यासाठी स्पर्धकांना अनेकदा जिवघेणे स्टंट करावे लागतात. आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवावं लागतं. अन् जे कलाकार स्वत:चा ताबा सोडतात. ते या शोमधून एलिमिनेट होतात. मात्र इतर स्पर्धकांना या शोमध्ये अधिक मेहनत करण्याची गरज नाही. कारण विजेता आधीच निश्चित करण्यात आला आहे. असा दावा राखी सावंतनं केला आहे. Mother's Day: पाहा बॉलिवूडच्या Yoga Mother; हेल्दी लाइफस्टाइलमुळं असतात चर्चेत राखी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, “बिग बॉस सीझन 14 मध्ये अभिनव शुक्लानं चमकदार कामगिरी केली होती. त्यानं या शोमध्ये अनेक कठीण टास्क अगदी सहजगतीनं पुर्ण केले होते. तो खूप स्ट्राँग आहे. आकर्ष आहे. आणि पट्टीचा राजकारणी देखील आहे. त्यामुळं तो कायम चर्चेत असतो. अन् चर्चेत राहणारे स्पर्धकच जिंकतात. त्यामुळं अभिनव शुक्लाच जिंकेल असा दावा तिनं केला आहे.”
  Published by:Mandar Gurav
  First published: