मुंबई 9 मे: अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bacchan) हा चित्रपटांइतकाच सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. इतकच नव्हे तर अनेकदा तो आपल्या चाहत्यांना त्यांच्या प्रतिक्रियांना उत्तरही देतो. नुकतच अभिषेक ने त्याच्या एका चाहत्याला उत्तर दिल आहे. त्यामुळे अभिषेकच्या या रिप्लायची चांगलीच चर्चा होत आहे. अभिषेक आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. एका य़ुझरने अभिषेक ला एक सुंदर कॉम्पलिमेंट दिली होती. नुकताच अभिषेक ‘बिग बुल’ (Big Bull) या चित्रपटात दिसला होता. यातील अभिषेकच्या कामाचं विशेष कौतुक झालं होत. तर यात त्याने हर्षद मेहताची (Harshad Mehta) भूमिका साकारली होती. तर याच कामाचं कौतुक करत त्या युझरने लिहिलं होतं, ‘बिग बुल पाहिल्यानंतर मला असं वाटतं की जेव्हा अभिनयाची गोष्ट येते तेव्हा तु बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही पुढे आहेस, आशिर्वाद गुरु भाई’ अस त्या युझरने लिहिल होत.
Mother’s Day: पाहा बॉलिवूडच्या Yoga Mother; हेल्दी लाइफस्टाइलमुळं असतात चर्चेत
यावर अभिषेक नेही उत्तर दिलं आहे. ते म्हणतो, ‘तुमच्या कौतुकासाठी खूप खूप धन्यवाद सर, पण त्यांच्या (अमिताभ बच्चन) पेक्षा कोणी नाही, कोणी त्यांच्यासारखं नाही.’ अभिषेकच्या या उत्तराने अनेकांनी मनं जिंकली आहेत. अनेकदा अभिषेक ला नेपोटिझम (Nepotism) टॅगचा सामना करावा लागतो. तर त्याच्या अभिनयामुळे नाही तर अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्यामुळे त्याला चित्रपट मिळतात असही बोललं जात. पण अभिषेकच्या उत्तराने अनेजन खूष झाले आहेत.
I am Committed to helping India fight COVID-19.
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) May 7, 2021
Every rupee we raise through this fundraiser will be doubled by our donor partners.
I BREATHE FOR INDIA, do you? Click on the link https://t.co/ZNS7xAX1HK
The only way to make a difference is - TOGETHER. #IBreatheForIndia pic.twitter.com/o9e62ZNCuR
अभिषेकने ‘रिफ्युजी’ (Refugee) या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होत. त्यानंतर त्याचे काही चित्रपट बॉक्सऑफिसवर चालले मात्र काही फ्लॉप देखिल ठरले होते. पण नुकतचं आलेल्या ‘बिग बुल’ या चित्रपटाने अभिषेकचं चांगलं कौतुक होत आहे. अभिषेक सध्या कोरोनाग्रस्तांसाठीही मदतीचा हात पुुढे करत आहे. ट्विटरद्वारे तो माहिती पुरवत असतो.