नाशिक, 05 ऑगस्ट : अयोध्येत काही वेळात राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. या भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारी घेतली जात आहे. नाशिकमध्ये मंदिरं खुली करा अशी मागणी करणाऱ्या साधू, संत, महंत, पुरोहित यांना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंदिरं खुली करा अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली होती. पण, राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आणि कलम 144 लागू असल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. आज खबरदारी म्हणून साधू, संत, महंत, पुरोहित यांना कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील रामकुंड, गोदा घाट येथील राम स्तंभ अभिषेक, पूजा अर्चा, गोदानदी पूजन अर्थात महाआरती करण्यास मनाई करण्यात आली आहे. रामकुंडामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा केल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा देत मध्यरात्रीच नाशिक पोलिसांनी शहरातील सर्व साधू, महंत, पुरोहित यांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाआरती करणारच असा पवित्रा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. पण, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पोलिसांनी सर्व मंहत आणि पुरोहितांना गर्दी न करण्याची विनंती केली आहे. नाशिकही रामाची भूमी आहे. याच ठिकाणी दंडकारण्य होतं. याच भागात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण वास्तव्य होतं. शूर्पणखेचं कापलेलं नाक या भूमीवर म्हणून नाशिक नाव झाल्याची आख्यायिका आहे. रामाच्या अनेक पुरातन मंदिराचं शहरात आहे. त्यामुळे रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनचा वाद चांगलाच पेटला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.