Home /News /entertainment /

पाकिस्तानने राखला दिलीप कुमारांचा मान; बालपणीचा ठेवा कायमस्वरूपी जपला

पाकिस्तानने राखला दिलीप कुमारांचा मान; बालपणीचा ठेवा कायमस्वरूपी जपला

दिलीप कुमार यांच्या घराला पाकिस्तानचा राष्ट्रीय ठेवा म्हणून याला घोषित करण्यात आलं आहे. तर मग जाणून घेऊया त्यांच्या या ऐतिहासिक घराची किंमत आज किती आहे?

    मुंबई 7 जुलै: जवळपास सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. (dilip kumar passed away) हिंदूजा रुग्णालयात सकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार हे भारतीय कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले असले तरी पाकिस्तानशी देखील त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी ते पेशावर येथे राहात होते. आज हे ठिकाण पाकिस्तानात आहेत. (Dilip Kumar house in Pakistan) फाळणीनंतर ते आपल्या कुटुंबीयांसोबत भारतात स्थायिक झाले. पेशावरमध्ये ते एका हवेलीत राहात होते. गेल्या काही काळात ही हवेली प्रचंड चर्चेत होती. पाकिस्तानचा राष्ट्रीय ठेवा म्हणून याला घोषित करण्यात आलं आहे. तर मग जाणून घेऊया दिलीप कुमार यांच्या या ऐतिहासिक घराची किंमत आज किती आहे? सत्यजीत रे दिलीप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा पेशावरमधील मोक्याच्या ठिकाणी असलेली ही हवेली आज जिर्ण अवस्थेत आहे. या घराच्या अवस्थेबद्दल या आधीही अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात या ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारती जतन करण्यासाठी सध्याच्या मालकांकडून त्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या इमारतींना पाकिस्तानचा राष्ट्रीय ठेवा घोषित करण्यात आलं आहे. कम्युनिकेशन अँड वर्क्स डिपार्टमेंटच्या एका रिपोर्टनंतर पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर यांनी सांगितलं की दिलीप कुमार यांचं घराचं क्षेत्रफळ चार मारला (1 मारला = 272.25 स्क्वेअर फूट) असून त्याची किंमत 80.65 लाख रुपये निश्तिच करण्यात आली आहे. या ऐतिहासिक वारशांचं जतन पाकिस्तानचा पुरातत्त्व विभाग करणार असून ती खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी द्यावी अशी विनंती या विभागाने सरकारला केली आहे. या इमारतींची डागडुजी करून ती त्यांना पूर्वीच स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या दिग्गज अभिनेत्यांच्या आठवणीही जागवल्या जातील, असं पाकिस्तानच्या सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. मोहम्मद युसूफ खान कसे झाले दिलीप कुमार? वाचा नावामागची काय होती कहाणी दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 ला पेशावरमध्ये झाला. त्यांनी 1944 मध्ये ज्वार भाटा या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दित त्यांनी 65 चित्रपटांत काम केलं. दिलीपकुमार यांचा अभिनय असा होता की त्यांना अभिनयाचं विद्यापीठ म्हटलं जातं. नया दौर, मुघल-ए-आझम, राम और शाम, गंगा-जमुना, कर्मा सौदागर असे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिले. अभिनेत्री सायरा बानोशी त्यांनी निकाह केला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाझ देऊन गौरवण्यात आलं आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actor, Dilip kumar, Entertainment

    पुढील बातम्या