जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Boney Kapoor : '25-30 दिवसात चित्रपट करणारे...'; बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा

Boney Kapoor : '25-30 दिवसात चित्रपट करणारे...'; बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा

बोनी कपूर-अक्षय कुमार

बोनी कपूर-अक्षय कुमार

25-30 दिवसात शूटिंग करत अक्षय एक चित्रपट पूर्ण करतो. पण आता हेच त्याच्या चित्रपटाच्या अपयशाचं कारण मानलं जात आहे. नुकतंच चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी नाव न घेता याच गोष्टीवरून अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  08 नोव्हेंबर : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार पूर्वी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जायचा. पण सध्या त्याची एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपटांची चर्चा आहे. अक्षयच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सध्या फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्याचे एका वर्षात 4 ते 5 चित्रपट सहज प्रदर्शित होतात. 25-30 दिवसात शूटिंग करत अक्षय एक चित्रपट पूर्ण करतो. पण आता हेच त्याच्या चित्रपटाच्या अपयशाचं कारण मानलं जात आहे. नुकतंच चित्रपट निर्माते  बोनी कपूर यांनी नाव न घेता याच गोष्टीवरून अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर नुकतेच कॉमेडियन कपिल शर्माच्या शो द कपिल शर्मा शोमध्ये मुलगी जान्हवी कपूरसोबत पोहोचले. शोमध्ये तो आपल्या मुलीच्या ‘मिली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता, परंतु यावेळी त्याने करिअर, बॉलिवूड आणि इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्सबद्दलही चर्चा केली. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेक दिग्गज कलाकारांबद्दल खुलासेही केले. यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीशी निगडीत अनेक दिग्गज कलाकारांबद्दल खुलासेही केले. यावेळी त्यांनी अक्षयचा नाव न घेता त्याच्याविषयी मोठं विधान केलं आहे. हेही वाचा - Samantha Prabhu : ‘मी अजून जिवंत आहे’; बोलता बोलता ढसाढसा रडू लागली समांथा; VIDEO व्हायरल द कपिल शर्मा शोमध्ये आलेले बोनी कपूर यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले. यादरम्यान ते म्हणाले की, ‘इंडस्ट्रीशी संबंधित काही स्टार्स त्यांच्या कामाबद्दल प्रामाणिक नाहीत, त्यांना फक्त 25-30 दिवसात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करायचे आहे आणि पूर्ण पैसे मिळवायचे आहेत. आपला मुद्दा पुढे करत ते म्हणाले- असे स्टार्स आपल्या कामाबद्दल प्रामाणिक नसतात आणि त्यामुळेच चित्रपट चांगले बनत नाहीत. चांगले आणि उत्तम चित्रपट बनवायला वेळ लागतो.’

बोनी कपूरने शोमध्ये केलेल्या या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यांनी केलेल्या या विधानाला चाहते  अक्षय कुमारशी जोडू पाहत आहेत.  अक्षय कपिलच्या शोमध्ये अनेक वेळा आला आहे आणि त्याने अनेक वेळा सांगितले की तो 25-30 दिवसांत चित्रपट पूर्ण करतो. चित्रपट बनवण्यासाठी ३० दिवस लागतात, असेही त्यांनी सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

बोनी कपूर सतत चित्रपटांची निर्मिती करत आहेत. त्याने मुलगी जान्हवी कपूरचा ‘मिली’ चित्रपटही तयार केला आहे, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नाहीये. याशिवाय बोनी अजय देवगणच्या मैदान या चित्रपटाचे निर्माते आहेत. बॉलीवूडसोबतच तो साऊथच्या चित्रपटांचीही निर्मिती करत आहे. या वर्षी आलेल्या साउथ अॅक्टर अजितच्या वलिमाई या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आणि जवळपास 234 कोटींचा व्यवसाय केला. त्याचे आगामी चित्रपट एक तमिळ आणि एक बॉलिवूड चित्रपट आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात