• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ठरलं! Valentine's Dayच्या दुसऱ्या दिवशी दिया मिर्झा चढणार बोहल्यावर, या उद्योगपतीशी बांधणार लग्नगाठ

ठरलं! Valentine's Dayच्या दुसऱ्या दिवशी दिया मिर्झा चढणार बोहल्यावर, या उद्योगपतीशी बांधणार लग्नगाठ

बॉलिवूडमधून (Bollywood) सध्या एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या येत आहेत. अनुष्का शर्मा आई बनण्यापासून वरुण धवनच्या लग्नापर्यंत अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी खूशखबर दिली. आता अभिनेत्री दिया मिर्झाकडून (Dia Mirza) देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 फेब्रुवारी: बॉलिवूडमधून (Bollywood) सध्या एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या येत आहेत. अनुष्का शर्मा आई बनण्यापासून वरुण धवनच्या लग्नापर्यंत अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी खूशखबर दिली. आता अभिनेत्री दिया मिर्झाकडून (Dia Mirza) देखील एक आनंदाची बातमी आली आहे. दिया मिर्झा व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी उद्योजक वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. स्पॉटबॉय डॉट कॉमच्या माहितीनुसार, मुंबईत हा विवाहसोहळा होणार असून, त्यात केवळ दोन्ही कुटुंबीय आणि त्यांचे अगदी जवळचे मित्र यांचीच उपस्थिती असेल. वैभव रेखी हे मुंबईतील एका उद्योजक असून, बांद्र्याच्या पाली हिल (Pali Hill) परिसरात राहतात. दिया मिर्झाचा पहिला विवाह साहिल संघा (Sahil Sangha) यांच्याशी झाला होता. दिया आणि साहिल हे अनेक वर्षं एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. 18 ऑक्टोबर 2014 रोजी ते विवाहबद्ध झाले होते. ऑगस्ट 2019मध्ये त्या दोघांनी आपण वेगळे होत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. वेगळं झाल्यानंतरही आपल्यात कोणतीही कटुता नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दोघांच्या सहीचं एक पत्र प्रसिद्ध करून त्यांनी याबाबतची घोषणा केली होती. (हे वाचा-मीरा राजपूतचे बोल्ड अंदाजातील PHOTOS आले समोर, बॉलिवूड अभिनेत्रींनाही टाकलं मागे) 'आयुष्याची 11 वर्षं एकमेकांसोबत व्यतीत केल्यानंतर आम्ही दोघांनी परस्परांच्या विचाराने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मित्र होतो आणि पुढेही राहू. आम्ही प्रेमाने आणि सन्मानाने एकमेकांपासून वेगळे होत आहोत,' असं दिया आणि साहिल यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर जवळपास दीड-दोन वर्षांनी दिया आता पुन्हा विवाहबद्ध होत आहे.
  दिया सुरुवातीला जाहिरातींसाठी मॉडेलिंग करायची. अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये ती सहभागी झाली होती. 2000 साली मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हा किताब तिला मिळाला. त्यानंतर 2001मध्ये रहना है तेरे दिल में या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दियाने दम, दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दस, लगे रहो मुन्नाभाई, परिणिता, संजू आदी चित्रपटांत अभिनय केला आहे. काफीर या वेबसीरिजमध्येही ती होती. पर्यावरण आणि सामाजिक कार्यातही ती सक्रीय असते. संयुक्त राष्ट्रसंघानेही दियाला भारताची पर्यावरणविषयक गुडविल अॅम्बेसिडर म्हणून नेमलं आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: