Home /News /entertainment /

चाहत्यांनी लग्नाबद्दल विचारताच सोनाक्षीचं विचित्र उत्तर, पर्सनल लाइफबद्दल केला खुलासा

चाहत्यांनी लग्नाबद्दल विचारताच सोनाक्षीचं विचित्र उत्तर, पर्सनल लाइफबद्दल केला खुलासा

दबंग गर्ल सोनाक्षीला खासगी प्रश्न विचारताच त्यावर तिनं बिनधास्त आणि मजेशीर अशी उत्तरं दिली आहे.

    मुंबई, 23 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वच लोक घरात बंदिस्त झाल्यासारखे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं लोकांनी घरातून बाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. क्रीडाक्षेत्रासह कलाकार मंडळीही घरांमध्ये असून अनेकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. तसंच काही सेलिब्रिटींनी चाहत्यांना काळजी घ्या असंही आवाहन केलं आहे. दरम्यान, कलाकार मंडळी आता सोशल मीडियावर सक्रीय झाली आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यातच सोशल मीडियावर दिलेल्या विचित्र उत्तरामुळे चर्चेत आली आहे. दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्रामव नेहमीच चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी Ask Sonakshi सेशन करते. चाहतेही त्यांचे प्रश्न सोनाक्षीला बिनधास्त विचारतात. यात अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतात. आताही एका चाहत्यानं लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर सोनाक्षीने विचित्र असं उत्तर दिलं आहे. एका युजरनं विचारलं की, तू लग्न कधी करणार आहेस. यावर सोनाक्षीने हे कुठं मिळतं? कुठून आणू शकते मी? कोणीतरी सांगा मला असं उत्तर दिलं. त्याचबरोबर  माझ्या लग्नाची एवढी काळजी तर माझे आई वडिलही करत नाहीत असंही ती म्हणाली. सोनाक्षीला तिच्या वजनावरूनही अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. एका चाहत्यानं तिला आवडती अभिनेत्री असल्याची कमेंट केली. त्यावर सोनाक्षीने त्याला ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तर एकाने जिम करतेस का असं विचारलं. त्यावर तिने नाही मी व्यायाम करते असं उत्तर दिलं. कोरोनामुळे सगळेच घरात बंदिस्त असताना सोनाक्षीला त्यावरून प्रश्न विचारण्यात आला. एका युजरनं विचारलं की, घरात कसे राहत आहात. यावरही तिनं मजेशीर उत्तर दिलं. सोनाक्षी म्हणाली की, 'लहानपणापासून जसं राहत आहे तसंच आताही राहत आहे.' हे वाचा : कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत कलाकार मंडळींच्या लग्नाचा प्रश्न नेहमीच विचारला जातो. सोनाक्षी सिन्हाही चाहत्यांच्या या प्रश्नातून सुटली नाही. मात्र यावर तिनं दिलेलं उत्तर मात्र चांगलंच चर्चेत आलं. एकाने विचारलं की, तु पतीच्या नावाशी लग्न करणार का? यावर सोनाक्षीने सांगितलं की, नाही, पूर्ण पतीशी लग्न करेन फक्त नावाशी नाही. हे वाचा : कोरोनामुळे अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन घरात बंद, इन्स्टाग्रामवर शेअर केले BOLD फोटो
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Sonakshi sinha

    पुढील बातम्या