मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kshitish Date: 'शिंदे साहेबांची पावरच एवढी की...' मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला भन्नाट किस्सा

Kshitish Date: 'शिंदे साहेबांची पावरच एवढी की...' मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला भन्नाट किस्सा

क्षितीश दाते (Kshitish Date) जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या घरी गेला होता तेव्हा नेमकं काय घडलं माहित आहे का?

क्षितीश दाते (Kshitish Date) जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या घरी गेला होता तेव्हा नेमकं काय घडलं माहित आहे का?

क्षितीश दाते (Kshitish Date) जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या घरी गेला होता तेव्हा नेमकं काय घडलं माहित आहे का?

मुंबई 5 जुलै: सध्या सगळीकडे ‘धर्मवीर’ (Dharmaveer) सिनेमाची बरीच चर्चा होताना दिसते. या सिनेमातून धर्मवीर आनंद दिघे (Ananad Dighe) यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितलेला आहे. या सिनेमाचं आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचं मोठं कनेक्शन आहे अशी चर्चा आहे. नुकताच या सिनेमाने पन्नास दिवसांचा टप्पा पूर्ण केला. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांची कारकीर्द पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde new CM Maharashtra) यांचा सुद्धा सिनेमात महत्त्वपूर्ण वाटा होता. अभिनेता क्षितीश दाते (Kshitish Date as Ekanath Shinde)  नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांचं हुबेहूब काम केलं आहे. शिंदे यांच्या भूमिकेसाठी क्षितीशने बरीच मेहनत घेतल्याचे अनेक विडिओ सुद्धा बरेच viral झाले होते. सध्या क्षितीश शिंदे यांच्या रोलशी निगडित आणि त्यांच्याशी निगडित काही आठवणी शेअर करताना दिसला आहे.

क्षितीश एका मुलाखतीत सांगतो, “शिंदे साहेबांच्या घरी आम्ही एक सिन शूट केला. त्यांच्या घरीच त्यांचं ऑफिससुद्धा आहे. त्यांच्या कामाचा व्याप एवढा आहे की त्यांच्या घरीच त्यांचं सगळं काम होतं. मला सेटवरून मेकअप करून गाडीतून त्यांच्या घरी नेण्याची सोय केली होती. आणि वाटेत रस्त्यात जिथे जिथे गाडी थांबत होती तिथे ज्यांनी कोणी मला पाहिलं सगळे अचंबित होऊन मागे जात होते. आश्चर्याचेच भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मी काचेतून अगदीच धुरकट दिसत होतो, तरी माझी प्रतिमा बघून मला अनेक लोक नमस्कार करून आदराने ‘जय महाराष्ट्र’ म्हणून जात होते.

शिंदे साहेबांची पॉवर इतकी जबरदस्त होती की त्यांचं दर्शन मला त्या काही मिनिटात जाणवत होतं. मी भूमिकेसाठी त्यांच्या अनेक निकटवर्तीयांशी संवाद साधला. त्यांच्या अनेक जवळच्या लोकांनी त्यांचा लुक हुबेहूब यावा म्हणून मला खूप मदत केली.”

हे ही वाचा- Shreya Bugde: स्विमिंग पूल आणि कमाल view; मित्रमंडळीसह श्रेया घेतेय सुट्ट्यांचा आनंद

या सिनेमात प्रसाद ओक या प्रसिद्ध अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. क्षितीश आणि प्रसाद या दोघांच्याही लुकसाठी विद्याधर भट्टे या प्रसिद्ध रंगभूषाकारांनी बरीच मेहनत घेतली होती.आनंद दिघे आणिएकनाथ शिंदे यांचा लुक अगदी जशाच्या तसा यावा यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती.

सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता हा सिनेमा फारच महत्त्वाचा मानला जातो आहे. अनेकांचे याबद्दल वाद आहेत, मतभेद आहेत, चित्रपटाच्या बऱ्याच गोष्टींबद्दल वेगवेगळे सिद्धांत मांडले जात आहेत पण आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांना मानणाऱ्या अनुयायांच्या नजरेतून हा चित्रपट म्हणजे त्यांचा त्यांच्या देवाशी असलेला पुनर्भेटीचा सोहळा आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Marathi cinema, New cm