मुंबई 1 जुलै: मराठी चित्रपटांना सध्या अच्छे दिन आले आहेत हे तिकीटबारीवर होणाऱ्या तुफान कामगिरीवरून नक्कीच लक्षात येत आहे. चंद्रमुखी पाठोपाठ आता प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ (Dharmaveer movie completed 50 days) चित्रपटाने सुद्धा थिएटर मध्ये पन्नास दिवसाचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थतीच्या गदारोळात अनेक ठिकाणी नाव येऊन सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि एवढा मोठा टप्पा पार करण्यात आज सिनेमाला यश आलं आहे.
या सिनेमाशी निगडित अनेक गोष्टी, अनेक आठवणी आणि किस्से याआधी बऱ्याच मुलाखतींमध्ये उलगडले आहेत. अगदी नाटकाच्या दिग्दर्शकांपासून निर्मात्यांपर्यंत प्रत्येकाचं एक कास नातं या चित्रपटाशी आहे. या सिनेमातून धर्मवीर आनंद दिघे साहेब (Ananad Dighe) यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितलेला आहे. आणि आनंद दिघे यांची कारकीर्द पुढे नेण्याचं काम ज्यांनी केलं ते मा. मुखमंत्री एकनाथ शिंदे (ekanth Shinde) यांच्या कालखंडाला विसरून चालणार नाही. अभिनेता क्षितीश दाते यांनी सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे (Who is new Chief minister of Maharashtra) यांचं हुबेहूब काम केलं आहे. शिंदे यांच्या भूमिकेसाठी क्षितीशने बरीच मेहनत घेतल्याचे अनेक विडिओ सुद्धा बरेच viral झाले होते.
आणि या चित्रपटाचा जीव असणारं पात्र म्हणजे आनंद दिघे यांचं पात्र ज्याने साकारलं तो (Prasad Oak) प्रसाद ओक. प्रसादने अगदी डोळ्यातल्या एक अन एक भावातून आनंद दिघे साहेबांना (Prasad Oak as Ananad Dighe) पडद्यावर जिवंत केलं. त्यांच्या लुकपासून अगदी प्रत्येक हालचालींपर्यंत प्रसादने जीव ओतून मेहनत घेतल्याचं दिसत आहे. दिघे साहेबांना पडद्यावर पाहून अनेकांना अक्षरशः साहेबच प्रत्यक्षात आले आहेत असा भास व्हावा एवढं अप्रतिम काम त्याने केलं असं अनेक सामान्य प्रेक्षकांचं म्हणणं आहे. क्षितीश आणि प्रसाद यांच्या अफाट लुकमागे ज्यांचा मोठा हात आहे असे विद्याधर भट्टे या रंगभूषाकारांचं सुद्धा बरंच कौतुक होताना दिसत आहे.
View this post on Instagram
सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता हा सिनेमा फारच महत्त्वाचा मानला जातोय. अनेकांचे याबद्दल वाद आहेत, मतभेद आहेत, चित्रपटाच्या बऱ्याच गोष्टींबद्दल वेगवेगळे सिद्धांत मांडले जात आहेत पण सामान्य प्रेक्षकांच्या नजरेतून हा चित्रपट म्हणजे त्यांचा त्यांच्या देवाशी असलेला पुनर्भेटीचा सोहळा आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.
View this post on Instagram
कर्मधर्मसंयोगाने एकीकडे हा चित्रपट पन्नास दिवस पूर्ण करत आहे तर या चित्रपटात ज्यांचा अध्याय विसरून चालणार नाही असे एकनाथ शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. कालच त्यांचा शपथविधी पार पडला तर आज ही आनंदाची बातमी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. हा योग्य अगदी सुवर्णयोग म्हणावा अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.
हे ही वाचा- PHOTO: काय झाडी, काय डोंगर, वा दादा वा... ! आवडत्या गाण्यासह प्राजक्ता घेतेय निसर्गाचा आनंद
धर्मवीरच्या ट्रेलर लाँचपासूनच या चित्रपटाची उत्सुकता कायम ठेवण्यात दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई यांना यश आलं होतं. कॅप्टन ऑफ द शिप असणाऱ्या प्रवीण तरडे यांच्या कामगिरीचं सुद्धा कौतुक होत आहे. उत्तम प्रमोशनमुळे हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला आता भविष्यात मराठी चित्रपटांना असेच चांगले दिवस बघता येऊ दे अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Maharashtra politics, Marathi cinema, New cm