मुंबई, 26 नोव्हेंबर : अभिनेता रणवीर सिंह नेहमी त्याच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखला जातो. त्याचा प्रत्येक लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा रणवीर फिमेल फॅशन स्टाइलचे ड्रेस घातलेल्या अवतारात दिसतो. जसं कधी लेडीज विंटर जॅकेट, तर कधी सुटसोबत लॉन्ग स्कर्ट. पण असं पहिल्यांदाच झालं आहे की रणवीरच्या फॅशनमुळे कोणी दुसरंच ट्रोल झालं आहे. हो, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीवर अशी वेळ आली आहे. अनेकदा बॉलिवूड कलाकार एकमेकांसारखे कपडे घातलेले दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोरा आणि सोनाक्षी सिन्हा यांचासोबतही असं झालं होतं. त्यानंतर असंच काहीसं रणवीर आणि राणीसोबत घडलं आहे. राणी मुखर्जी सध्या तिचा आगामी सिनेमा ‘मर्दानी’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या प्रमोशनसाठी तिनं सब्यसाचा डिझायनर ड्रेस घातला होता. तिचा हा फोटो स्वतः सब्यसाचीनं त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र राणीच्या लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. …आणि अचानक दीपिकानं उघड केलं आलिया-रणबीरच्या लग्नाचं गुपित, पाहा VIDEO
राणी मुखर्जीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना तिला पाहून रणवीर सिंहची आठवण आली. रणवीर सिंहनं काही दिवसांपूर्वीच लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला यावेळी त्यानं जो ड्रेस घातला होता. तो ड्रेस आणि राणी मुखर्जीच्या प्रमोशन लुकमध्ये काहीही फरक नव्हता. विशेष म्हणजे रणवीरचा ड्रेस सुद्धा डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन केला होता. मलायकानं शेअर केला YOGA VIDEO, अर्जुन कपूरच्या काकानं केली ‘ही’ कमेंट
राणीचा लुक पाहिल्यावर लोकांना हे ओळखायला वेळ लागला नाही की राणीचा ड्रेस रणवीरच्या ड्रेससारखा आहे. त्यानंतर सर्वांनीच सोशल मीडियावर राणी मुखर्जीला यावरून ट्रोल करायला सुरुवात केली. राणी आणि रणवीरच्या ड्रेसमध्ये फरक फक्त एवढाच होता की राणी यासोबत दुपट्टा घेतला होता. तर रणवीरनं यावर जॅकेट घातलं होतं.
हे आहे प्रेग्नन्सीनंतरही करिना कपूरच्या स्लिम आणि हॉट फिगरचं रहस्य
===============================================================

)







