अभिनेत्री करिना कपूरनं बाॅलिवूडमध्ये झीरो फिगरची संकल्पना आणली. आपलं आरोग्य, फिगर याबद्दल करिना कपूर नेहमीच जागरुक आहे. तिच्या फिटनेससासाठी ती काय करते वाचा
करिना जास्त महत्त्व देते ती योगाला. ती रोज पाॅवर योग, अष्टांग योग, सूर्यनमस्कार या गोष्टी करते. सोबत मेडिटेशनही करते.
करिना शाकाहारी आहे. ब्रेकफास्टला करिना सोया मिल्क, ब्रेड, चीज घेते. दुपारच्या जेवणात ती चपाती, डाळ, ग्रीन सॅलॅड आणि भाज्यांचं सूप घेते.
करिना दिवसाला 6 ते 8 ग्लास उकळलेलं पाणी पिते. महत्त्वाचं म्हणजे दिवसभर ती तीन-तीन तासांनी काही तरी खाणं पसंत करते.