…आणि अचानक दीपिकानं उघड केलं आलिया-रणबीरच्या लग्नाचं गुपित, पाहा VIDEO

…आणि अचानक दीपिकानं उघड केलं आलिया-रणबीरच्या लग्नाचं गुपित, पाहा VIDEO

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे. मात्र या चर्चामध्ये कितपत तथ्य आहे. याबाबत मात्र कुणालाच काही माहित नाही. पण दीपिका पदुकोणनं चुकून आलियाच्या लग्नाचं गुपित उघड केलं आहे. खरं तर आलिया आणि रणबीर त्याच्या लग्नाची बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते मात्र दीपिकानं एका मुलाखतीमध्ये रणबीर-दीपिकाच्या लग्नाबाबत खुलासा केला. त्यावरुन तरी हे दोघं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असा अंदाज लावला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोण, आलिया भट, रणवीर सिंह, आयुष्मान खुराना, मनोज वाजपेयी, साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा, पर्वती तिरुवोतो आणि विजय सेतुपती फिल्म कंपेनियननं होस्ट केलेल्या एका मुलाखतीत एकत्र दिसले. ज्यात होस्टनं इंडियन सिनेमातील असा कोणता अभिनेता किंवा अभिनेत्री आहे ज्याच्याकडून तुम्ही सल्ला घ्यावासा वाटतो असा प्रश्न सर्व स्टार्सना विचारला. ज्यावर उत्तर देताना विजय देवरकोंडा म्हणाला, ‘न लाजता मी एक गोष्ट सांगेन की, इथं बसलेल्या काही लोकांवर मला क्रश होता. मी दीपिका आणि आलियाच्या प्रेमात होतो. पण दीपिकाचं लग्न झालं आहे.’ यावर दीपिका मध्येच बोलली, ‘...आणि आलियाचं होणार आहे.’

हे आहे प्रेग्नन्सीनंतरही करिना कपूरच्या स्लिम आणि हॉट फिगरचं रहस्य

दीपिकानं असं बोलताना आलियानं लगेचच तिला थांबवलं की, ती या गोष्टीची घोषणा का करत आहे. त्यानंतर दीपिकाला स्वतःची चूक लक्षात आली आणि सावरासावर करत ती म्हणाली असं काही नाही आहे ही गोष्ट मी माझ्या मनानं बोलले.

सिद्धार्थ-रश्मीचा स्विमिंग पूलमध्ये रोमान्स, शहनाझनं शूट केला VIDEO

मागच्या वर्षी दीपका पदुकोणच्या लग्नाच्याआधी आलिया भटनंही करण जोहरच्या चॅट शोमध्ये दीपिकाच्या लग्नाची बातमी उघड केली होती. करणचा चॅट शो कॉफी विथ करणच्या मागच्या सीझनमध्ये दीपिका आणि आलिया करणच्या पहिल्या गेस्ट होत्या.

काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जात होतं की, रणबीर कपूर आणि आलिया भट 2020 च्या फेब्रुवारीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकतील. एका मुलाखतीत याविषयी विचारलं असता आलियानं काहीच उत्तर दिलं नाही मात्र ती हसत राहीली होती.

OMG! आलिया भटचं ‘मेल व्हर्जन’, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

=========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2019 12:18 PM IST

ताज्या बातम्या