मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Karan Johar सैफ अली खानच्या मुलाला करतोय लॉन्च; या चित्रपटाद्वारे करणार पदार्पण

Karan Johar सैफ अली खानच्या मुलाला करतोय लॉन्च; या चित्रपटाद्वारे करणार पदार्पण

करण जोहर त्याच्या चित्रपटांमध्ये केवळ स्टार किड्सलाच संधी देतो त्यामुळं त्याच्यामार्फत तयार केलेल्या कलाकृतींवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. मात्र याही परिस्थितीत विरोधकांच्या टीकेची पर्वा न करता आता तो सैफ अली खानच्या मुलाला देखील लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 31 मार्च: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput death) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. परिणामी स्टार किड्सवर सध्या जोरदार टीका होत आहे. त्यांच्या चित्रपटांवर डिसलाईक्स पाऊस पडत आहे. अन् या वादाचा केंद्र बिंदू सध्या करण जोहरला (Karan Johar) मानलं जात आहे. तो आपल्या चित्रपटांमध्ये केवळ स्टार किड्सलाच संधी देतो त्यामुळं त्याच्यामार्फत तयार केलेल्या कलाकृतींवर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. मात्र याही परिस्थितीत विरोधकांच्या टीकेची पर्वा न करता आता तो सैफ अली खानच्या मुलाला देखील लॉन्च करण्याची तयारी करत आहे. (Saif Ali Khan son Ibrahim Ali khan)

पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात सैफचा मुलगा इब्राहिम अली खान देखील झळकणार आहे. खरं तर इब्राहिमला अभिनयाची खास आवड नाही. त्यामुळं तो अभिनेता म्हणून नव्हे तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण गेली अनेक वर्ष इब्राहिमला चित्रपटात काम करण्याविषयी विचारत होता. परंतु त्याला दिग्दर्शनात अधिक रस आहे. त्यामुळं करणनं आपल्याच चित्रपटात त्याला ती संधी दिली. करणच्या या निर्णयावर सध्या काही विरोधक जोरदार टीका करत आहेत. प्रेक्षकांच्या संतापासून वाचण्यासाठी करणनं ही नवी खेळी केली. अशी टीका त्याच्यावर केली जात आहे.

अवश्य पाहा - ‘तारे जमीन परचा दिग्दर्शक आमिर नाही मी होतो’; अमोल गुप्तेचा खळबळजनक खुलासा

करण जोहरनं ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटात शेवटचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यानंतर त्यानं ‘लस्ट स्टोरी’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं होतं. येत्या काळात त्याचा तख्क्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटात इब्राहिमचा मुलगा सहाय्यक दिग्दर्शक असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Saif Ali Khan