Home /News /entertainment /

Sidhu Moosewala Murder Case : सिद्धू मुसेवाला प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश, शस्त्रे स्फोटकांसह दोन शूटर्सना अटक

Sidhu Moosewala Murder Case : सिद्धू मुसेवाला प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश, शस्त्रे स्फोटकांसह दोन शूटर्सना अटक

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या (Sidhu Musewala massacre) प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला (delhi police special cell) मोठे यश मिळाले

  नवी दिल्ली, 21 जून : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या (Sidhu Musewala massacre) प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला (delhi police special cell) मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या स्पेशल सेलने या हत्येतील दोन मुख्य शार्प शुटरना (sharp shooters) अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शूटर्सच्या मॉड्यूलचा प्रमुखही पकडला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके (Weapons and ammunition seized) जप्त केली आहेत.

  दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या बिश्नोईलाही मुख्य सूत्रधार मानले आहे. विशेष म्हणजे अगदी सुक्ष्म पुराव्याच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण उकलण्याचा दावा पोलिसांनी केला होता.

  हे ही वाचा : MLC Election Result : शिवसेनेत अंतर्गत कलह वाढला! सेनेची 12 मतं फुटली, आजची बैठक ठरणार महत्त्वाची

  स्पेशल सेलचे सीपी एचजीएस धालीवाल यांनी पत्रकार परिषदेत मूसेवाला हत्याकांड संदर्भात अनेक मोठे खुलासे केले. ते म्हणाले की, आमच्या टीमने या घटनेत सहभागी असलेल्या 6 शार्पशूटर्सची ओळख पटवली आहे. काहीजण बोलेरो वाहनात होते तर काहीजण दुसऱ्या वाहनात बसले होते, यामध्ये अंकित सिरसा, दीपक मुंडी, प्रियव्रत, जगदीप रूपा आणि मनप्रीत मन्नू यांचा सहभाग होता. असे सांगण्यात आले.

  आरोपींनी मूसेवालावर एके ४७ ने गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मनप्रीतने AK 47 च्या आधी गोळीबार केला. हत्येत अनेक पिस्तुलांचाही वापर करण्यात आला. आरोपींकडे ग्रेनेडही होते. आमच्या पथकाने या आरोपींना गुजरातमधील मुंद्रा बंदरातून अटक केल्याचे धालीवाल यांनी सांगितले. आरोपींनी बंदराजवळ भाड्याने खोली घेतली होती. या प्रकरणात आमच्या टीमने शार्पशूटर प्रियव्रत याला पकडले. 26वर्षीय प्रियव्रत हा हरियाणातील सोनीपतचा रहिवासी आहे. प्रियव्रत सिद्धू हा मुसेवाला हत्याकांडातील मुख्य शूटर आहे. असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

  हे ही वाचा : Monsoon Update : राज्यात 6 जिल्ह्यात orange तर 12 जिल्ह्यांना yellow alert, मुंबईसह परिसरात जोरदार पावसाची शक्यता

  मुसेवाला यांची 29 मे रोजी सायंकाळी 5 वाजता हत्या करण्यात आली होती. घटनेच्या वेळी मुसेवाला त्यांच्या वाहनातून इतर दोघांसोबत प्रवास करत होते. या घटनेनंतर पोलिसांची अनेक पथके या हत्येतील आरोपींचा शोध घेत होती. तपासादरम्यान ख्याला गावात बेवारस स्थितीत उभी असलेली बोलेरो कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Delhi latest news, Delhi Police, Murder, Murder news

  पुढील बातम्या