मुंबई, 21 जून : राज्यात अखेर मान्सूनला (monsoon update) जोरदार सुरूवात झाली आहे. कालपासून कोकणासह (Konkan heavy rain) राज्यातील विवीध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली, काल काही काळ मुंबईत पावसाचे (Mumbai rain) आगमन झाल्याने मुंबईकरांना उष्णतेपासून (heat wave) दिलासा मिळाला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri) रविवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मॉन्सून (monsoon) दाखल झाला असला तरीही पाऊस अजून स्थिरावलेला नसल्याने पेरण्या करण्याची गडबड न करण्याचे आवाहन हवामान खात्याकडून (imd alert) करण्यात आले आहे. याचबरोबर हवामान विभागाकडून 6 जिल्ह्यात orange alert तर 12 जिल्ह्यांना yellow alert देण्यात आला आहे. (many district heavy rain monsoon update orange and yellow alert)
देशातील अनेक भागात मान्सूनची प्रतीक्षा
देशातील बहुतांश भागात अद्याप मान्सूनची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनी म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. आतापर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार खरीप लागवडीत घट दिसून आली आहे. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागलेल्या आहेत.
हे ही वाचा : MLC Election Result : विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘चमत्कार’ घडवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं पहिलं मोठं विधान
Nowcast warning at 2200 Hrs 20 Jun: Thunderstorm with lightning & light to moderate spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Nanded,Latur,Hingoli, Parbhani,O'bad in next 3-4 hrs. Take precautions.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 20, 2022
-IMD MUMBAI
केरळात वेळेआधी पोचून ३१ मेपर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी मान्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (11 जून) बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मान्सून दाखल झाला. 13 जून रोजी मान्सूनने संपूर्ण कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत 16 जून रोजी मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदियापर्यंत पावसाने हजेरी लावली. तर रविवारी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. नियमित वेळेनुसार साधारणतः 15 जून रोजी मॉन्सून सर्व राज्यात दाखल होतो. यंदा चार दिवस उशिराने मान्सून राज्यात सर्वदूर दाखल झाला आहे.
राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमान कमी झाले आहे.राज्यात मागच्या 24 तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे तापमानाचा पारा 38 अंशांवर असून, उर्वरित राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे.
हे ही वाचा : MLC Election Result : शिवसेनेत अंतर्गत कलह वाढला! सेनेची 12 मतं फुटली, आजची बैठक ठरणार महत्त्वाची
याचबरोबर मागच्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत अलिबाग 39, तळा 40, हर्णे 36, रत्नागिरी 40, दोडामार्ग 38, कुडाळ 39, मालवण 105, सावंतवाडी 43, वेंगुर्ला 61 मिलीमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील सोयगाव 40, अंबाजोगाई 18, परळी वैजनाथ 19, भोकरदन 18, देगलूर 45, उस्मानाबाद 12, सेलू 37. विदर्भ अमरावती 31, चांदूरबाजार 48, चिखलदरा 38, मोशी 36, तिवसा 52, मोहाडी 37, पवनी 32 साकोली 52, अर्जुनी 33, कळमेश्वर 35, काटोल 36.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) कोकण: पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर, विदर्भ यवतमाळ, चंद्रपूर,
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली