मुंबई, 15 ऑक्टोबर : अभिनेत्री दीपिका नेहमीच कोणत्याही मुलाखतीमध्ये पती रणवीर सिंह बद्दल इंटरेस्टिंग गोष्टी शेअर करत असते. रविवारी मुंबईत पार पडलेल्या जियो मामी मूव्ही मेला विथ स्टार्स 2019 मध्येही काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. रणवीरबद्दल बोलताना दीपिका अचानक मागे वळून तो इथे आलाय का असं विचारताना दिसली. या इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. यावेळी अनुपमा चोप्रा आणि राजीव मसंद यांच्याशी बोलताना दीपिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या इव्हेंटमध्ये दीपिका रणवीर सिंहची वर्किंग स्टाइल, नव्या भूमिकेची तयारी याबद्दल बोलताना दिसली. दीपिका म्हणाली, त्याची प्रत्येक गोष्ट बदलते. त्याचा वॉडरोब, परफ्यूम, त्याची कार, त्याची चाल, कपडे सर्वकाही बदलून जातं. असं सांगताना दीपिका मध्येच थांबते आणि विचारते, तो आहे का इथे. टीव्ही अभिनेत्रीनं बिकिनी फोटोमध्ये दाखवले शरीरावरील व्रण, म्हणाली…
दीपिकाचा हा अवतार पाहून सर्वजण हसू लागतात. यावर होस्ट म्हणतो तो इथे कसा असेल. यावर उत्तर देताना दीपिका सांगते, त्याचं काहीही सांगता येत नाही. हे ऐकल्यावर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकतो आणि नंतर पुन्हा ती रणवीर सिंहची नक्कल करताना म्हणते, माझ्याबद्दल बोलत आहेस का? दीपिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 90 च्या दशकातील ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार दीपिका पुढे सांगते, त्याचं असं आहे की, तुम्ही त्याची पूर्ण प्रक्रिया पाहू शकता, जर तो खिलजीची भूमिका साकरत आहे तर तो सोटवरही तशाच प्रकारे येतो. तसाच बोलतो. तो सतत त्या भूमिकेत वावरत असतो. त्याच्या अशा वागण्यावर मी नेहमी त्याला मस्करीत म्हणते, तुझ्या या वागण्यामुळे कदाचित आपलं नातं एवढं दिर्घकाळ टिकलं. कारण दर 6 महिन्यानंतर तो मला एक वेगळा माणूस म्हणून भेटतो.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहनं दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या तीन सिनेमात एकत्र काम केलं आहे. यात ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या सिनेमांचा समावेश आहे. Sheer Qorma लेस्बियन लव्ह स्टोरी सांगणारा नव्या सिनेमाचा लुकने भुवया उंचावल्या ============================================================= मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO