टीव्ही अभिनेत्रीनं बिकिनी फोटोमध्ये दाखवले शरीरावरील व्रण, म्हणाली...

टीव्ही अभिनेत्रीनं बिकिनी फोटोमध्ये दाखवले शरीरावरील व्रण, म्हणाली...

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी सुद्धा सध्या बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत दुबईमध्ये व्हेकेशन एंजॉय करत असून तिनं नुकतेच सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : मागच्या काही दिवसांपासून बरेच सेलिब्रेटी व्हेकेशन मोडवर आहे. सोनम कपूर मालदीवमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री नुसरत भारुचा देखील थायलंडमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहे. या स्टार्स सोबत टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी सुद्धा सध्या बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत दुबईमध्ये व्हेकेशन एंजॉय करत आहे. आपल्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर  केले आहेत. ज्यात ती बिकिनीमध्ये फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

काम्यानं तिचे हे फोटो शेअर करताना हे सुद्धा स्पष्ट केलं की त्याच्या शरीरावर दिसणारा प्रत्येक व्रण एक कहानी सांगतो. काम्यानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, माझं शरीर एक कॅनव्हस प्रमाणे आहे. ज्यावरील प्रत्येक व्रण मी किती साहसी आहे आणि यासाठी मला काय किंमत चुकवावी लागली याची मला आठवण करुन देतो. मी ती प्रत्येक गोष्ट वेड्यासारखी लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकवेळी बदलणारं वजन जे कधी माझ्या मुलांमुळे तर कधी खाण्यामुळे वाढत होतं. पण आता मला माझ्या या कॅनव्हसवर अभिमान आहे आणि भविष्यात त्यावर तयार होणाऱ्या नव्या चित्राची प्रतीक्षा आहे.

Sheer Qorma लेस्बियन लव्ह स्टोरी सांगणारा नव्या सिनेमाचा लुकने भुवया उंचावल्या

 

View this post on Instagram

 

My body is my canvas , each mark tells a story and reminds me how I’m braver than what caused it, each dot which at some point I may have tried to hide as a silly conscious younger self and the ever changing pounds on me depending on my love for my baby and my love for food ! I m proud of and own my canvas and can’t wait to fill it with the brushes of my desires in the years to come...!!!

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

काम्या या फोटोंमध्ये बिकिनीमध्ये दिसत आहे. यासोबतच तिच्या शरीरावर अनेक व्रण सुद्धा दिसत आहेत. तिच्या या फोटोंवर बॉयफ्रेंड शलभने सुद्धा कमेंट केली आहे. त्यानं लिहिलं, मला तुझा खूप अभिमान आहे.

90 च्या दशकातील ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार

 

View this post on Instagram

 

Most of my life i have been chasing the kind of high that i feel right now 😇🌟❤️

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत काम्यानं सांगितलं होतं की, ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिचा बॉयफ्रेंड शलभ हा एक डॉक्टर असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे.

KBC11: पत्नीच्या हट्टामुळे हनी झाला 'करोडपती' धनी, विजेता 7 कोटीही जिंकणार का?

========================================================

मनसेसाठी निवडणुकीच्या प्रचारात उतरला अभिनेता सिद्धार्थ जाधव, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 09:21 AM IST

ताज्या बातम्या