मुंबई, 14 ऑक्टोबर : लेस्बियन लव्हस्टोरी सांगणाऱ्या शीर कोरमा Sheer Qorma नावाच्या आगामी बॉलिवूड सिनेमाचं पोस्टर रीलिज झालं आणि नव्या चर्चेला तोंड फुटलं. अभिनेत्री स्वरा भास्करने Swara Bhaskar या सिनेमाचं पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. शीर कोरमा या चित्रपटात स्वरा भास्करबरोबर दिव्या दत्ता Divya Dutta आणि शबाना आझमी Shabana Azmi यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
Aaaaand HERE IT IS.. First look of a film I’m so proud to have been part of: #SheerQorma! Starring @AzmiShabana @divyadutta25 @Kalyanmayee @PriyaSometimes @jitin0804 and me! 😻 written and directed by @futterwackening Produced @MARIJKEdeSOUZA #LGBT #LoveWins #LGBTQ #LoveisLove pic.twitter.com/y5UVfXo81C
— Swara Bhasker (@ReallySwara) October 12, 2019
पोस्टरमध्ये स्वरा भास्कर आणि दिव्या मुस्लीम मुलींच्या पेहरावात दिसत आहेत. या हिजाब घातलेल्या दोन स्त्रिया एकमेकींचे हात पकडून आहेत. समलिंगी संबंधांवर आणि प्रेमावर हा सिनेमा भाष्य करतो. सिनेमाचं पोस्टर रीलिज होताच स्वराच्या लुकची चर्चा सुरू झाली. अनेकांनी या धाडसी विषयाचं कौतुक केलं आणि या सिनेमाविषयी उत्सुकता असल्याचं सांगितलं. तर काहींनी याविषयी नापसंती व्यक्त केली. वाचा - 90 च्या दशकातील ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार नेमकं चित्रपटाचं कथानक काय आणि शबाना आझमींसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीनं कुठली भूमिका निभावली आहे हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र चर्चेला मात्र सुरुवात झाली आहे. ————————————– धगधगत्या जीपखाली अडकली होती इवलीशी पिल्लं, माणुसकीचं दर्शन घडवणारा LIVE VIDEO