90 च्या दशकातील ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार

90 च्या दशकातील ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आता झाली पॉर्न स्टार

जेव्हा तिने पहिल्यांदा अडल्ट सिनेमात काम केलं होतं तेव्हा तिला स्वतःची भूमिका फार आव्हानात्मक वाटली होती. सिनेमाची कथा वाचल्यानंतर तिने सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला होता.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर- 90 च्या दशकातील बॉय मीट्स वर्ल्डमध्ये काम केलेली स्टार अभिनेत्री मॅटलेंड वार्डबद्दल एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन अभिनेत्री मॅटलेंड वार्डने पॉर्न इण्डस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली असून सध्या ती पॉर्न स्टार म्हणून प्रचलित आहे. पॉर्न इण्डस्ट्रीमध्ये मॅटलेंडला रिशेल मॅक्गवायर नावाने ओळखलं जातं. मॅटलेंड वार्डनेही एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. सध्या ती ड्राइव या पौढ सिनेमाच्या निर्मितीत व्यग्र आहे.

मॅटलेंड वार्डने तिच्या करिअरची सुरुवात 1994 मध्ये बोल्ड अँड ब्यूटीफुल या मालिकेतून केली होती. त्यावेळी मॅटलेंड वार्ड फक्त 16 वर्षांची होती. यानंतर वार्डने यूएसए हाय, रूल्स ऑफ एन्गेजमेन्ट आणि होम इम्प्रूवमेन्टच्या सातव्या सीझनमध्ये काम केलं होतं. मॅटलेंड वार्डने 1997 मध्ये मारियो लोपेजसोबत किलिंग मिस्टर ग्रिफिन या सिनेमातही काम केलं होतं.

मॅटलेंड वार्डला 1998 मध्ये सर्वाच लोकप्रिय शो बॉय मीट्स वर्ल्डमध्ये मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली होती. या मालिकेनंतर तिचं नाव घराघरात पोहोचलं होतं. यानंतर वर्ष 2000 पर्यंत तिने या मालिकेत काम केलं. 2004 मध्ये तिने विनोदीपट व्हाइट चिक्समध्येही काम केलं.

एका मुलाखतीत 42 वर्षीय मॅटलेंड वार्डने पॉर्न सृष्टीत जाण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना म्हटलं की, जेव्हा तिने पहिल्यांदा अडल्ट सिनेमात काम केलं होतं तेव्हा तिला स्वतःची भूमिका फार आव्हानात्मक वाटली होती. सिनेमाची कथा वाचल्यानंतर तिने सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला होता. वार्डच्या मते, तिची भूमिका फार सुंदर लिहिण्यात आली होती. मॅटलेंड वार्डनुसार, तिच्या पॉर्न करिअरची सुरुवात कोजप्लेने झाली होती.

#sairatmetshadak- रिंकू-जान्हवीचा एकत्र फोटो पाहून चाहते झाले झिंगाट!

83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS

मामा-भाच्यांचे असेही वैर; गोविंदामुळे कृष्णाने सोडला कपिल शर्माचा शो

लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, शेअर केला PHOTOS

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या