जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'प्रेमात फसवणूक ही तर… ', दीपिका पादुकोण Relationship मधल्या cheating बद्दल पहिल्यांदा उघडपणे बोलली

'प्रेमात फसवणूक ही तर… ', दीपिका पादुकोण Relationship मधल्या cheating बद्दल पहिल्यांदा उघडपणे बोलली

'प्रेमात फसवणूक ही तर… ', दीपिका पादुकोण Relationship मधल्या cheating बद्दल पहिल्यांदा उघडपणे बोलली

‘गहराईयां’ (Gehraiyaan) चित्रपट रिलीज झाल्यापासून अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच दीपिका पादुकोणने प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये होणारी फसवणूक या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 22 फेब्रुवारी- दिग्दर्शक शकुन बत्राचा (Shakun Batra) ‘गहराईयां’ (Gehraiyaan) चित्रपट रिलीज झाल्यापासून अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य कारवा (Dhairya Karwa) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे लव्ह-लस्ट स्टोरी आहे. यामध्ये दीपिका अतिशय बोल्ड अवतारात दिसत असून, तिने तेवढीच बोल्ड भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान, दीपिका पादुकोणनेही प्रेम आणि रिलेशनशिपमध्ये फसवणूक या विषयावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच प्रेमात किंवा रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्यास तिला फरक पडतो की नाही, याबद्दलही तिनं सांगितलं आहे. ‘वी आर युवा’च्या मुलाखतीत दीपिकाने तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यावेळी तिला विचारण्यात आलं की, ‘प्रेमात मिळणारा धोका ही तिच्यासाठी अजूनही मोठी गोष्ट आहे का?’ यावर उत्तर देताना दीपिका म्हणते, ‘यावरून मी कोणत्याही नात्याला जज करणार नाही.’ दीपिका पुढे म्हणाली, ‘रिलेशनशिप कनेक्शनवर आधारित असतात. जेव्हा तुमचं स्वतःशी असलेलं कनेक्शन तुटतं, तेव्हा तुम्ही कोणाशीही संबंध ठेवू शकत नाही.’ नात्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्याने त्रास होतोच. मग ती फसवणूक मानसिक असो वा शारीरिक. होय मानसिक फसवणूक ही इतर कोणत्याही फसवणुकीपेक्षा जास्त घातक असते, असं दीपिका सांगते. वाचा- विकास पाटीलनं गावकडं बांधलं अलिशान घर, फोटो पाहून थक्क व्हाल! दीपिकाने रिलेशनशिपवर (relationship) बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकवेळा धोका आणि प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे आणि या मुद्द्यावर आपलं मतही उघडपणे व्यक्त केलं आहे. नुकतेच एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने (boyfriend) तिची कशा प्रकारे फसवणूक केली होती, याबद्दल भाष्य केलं होतं. दीपिका म्हणाली होती, की ‘मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला मला चीट करताना रंगेहाथ पकडलं होतं. ही फसवणूक मला सहन झाली नाही. त्यामुळे मी ते नातं तोडलं.’ परंतु तिने चीट करण्याऱ्या बॉयफ्रेंडचं नाव घेतलं नाही. वाचा- 3 महिन्यांपासून Saba Azad ला डेट करतोय हृतिक रोशन? ‘याठिकाणी’ झाली पहिली भेट दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तर दीपिका ‘गहराईयां’नंतर आता शाहरूख खानसोबत पठाण चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती फायटर आणि प्रोजेक्ट-केच्या रिमेकमध्येही दिसणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात