मुंबई, 22 फेब्रुवारी- बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 3) तिसरा सीझन संपला आहे. मात्र यातील स्पर्धकांची आजही सोशल मीडियावर चर्चा असते. टॉप थ्रीमध्ये विकास पाटीलने (Vikas Patil) मजल मारली होती. त्याच्या खेळाचे जितके कौतुक झाले तितकेच त्याच्या मैत्रिची देखील या घरात कौतुक झाले. मग ती मैत्री विशाल निकसोबतची असेल किंवा सोनाली पाटीलसोबतची. याशिवाय जरी मीनल शाहशी शेवटी त्याचे खटके उडाले मात्र या दोघांच्यात देखील सुरूवातीपासून मैत्री ही होतीच. बिग बॉसच्या घऱातून बाहेर पडल्यानंतर विकास पाटील कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसला नाही. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. विकासने (Vikas Patil New House) गावकडे स्वप्नातील असं एक अलिशान घर बांधलं आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाचा- VIDEO:हर्ष लिंबाचियाला होतोय भारती सिंहसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, केला खुलासा विशाल पाटीलने त्याच्या इन्स्टावर त्याच्या गावकडील अलिशान घराचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या घराचे नाव ज्ञानदीप असं आहे. मस्त कोल्हापूरी स्टाईल त्याने घर बांधलं आहे आणि तेही शेतात. त्यानं घऱाचे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला, जबाबदारी भाग पाडते, गाव सोडायला परंतु गावाशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच्या वास्तू पूजे निमित्ताने माझ कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणं झालं, छान वेळ देता आला. गाव आणि गावाकडच्या गोष्टींची बातच निराळी!❤️
यासोबतच विशालने या घरातून एका लाईव्ह व्हिडिओ देखील केला होता. यावेळी तो आपल्या गावाबद्दल तसेच घराबद्दल खूप काही बोलले आहे.त्याने त्याच्या आई वडिलांचा देखील परिचय करून दिलेला पाहायला मिळाला. आपलं गावी एक टुमदार घर असावं अशी विकासची मनापासून इच्छा होती. आणि ती पूर्ण झाली याचं समाधान खूप आहे असे तो या व्हिडिओत सांगताना दिसतो. सध्या विकास पाटील आपल्या गलगले या गावी असून कुटुंबासोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे.