मुंबई, 22 फेब्रुवारी- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या आपल्या रुमर्ड गर्लफ्रेंडमुळे प्रचंड चर्चेत आहे. ही रुमर्ड गर्लफ्रेंड दुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद (Saba Azad) असल्याचं आम्ही आधीच्या काही रिपोर्ट्समध्ये सांगितलं होतं. हृतिक आणि सबामध्ये नव्याने नातं उमलत आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंट ते कौटुंबिक फोटोमध्ये एकत्र पाहिलं जात आहे. चाहत्यांना या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय? आणि त्यांची भेट कशी झाली हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने हृतिकच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवला होता. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंचा बोलबाला होता. अलीकडे अशीही बातमी आली होती की, हृतिकने सबासोबतचे नाते काही महिन्यांपासून लपवले होते.परंतु कलाकारांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी ते मीडियाच्या नजरेत आल्याशिवाय राहात नाहीत. असंच काहीसं हृतिक आणि सबासोबतसुद्धा झालं आहे. परंतु त्यांना रेस्टॉरंटमधून हातात-हात घालून बाहेर पडताना पाहिल्यानंतर सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. ते गेल्या काही महिन्यांपासून सोबत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर ज्यांना हृतिक आणि सबाच्या नात्याबद्दल आधीच माहिती आहे त्यांना सार्वजनिकरित्या कॅमेऱ्यासमोर येण्याच्या अभिनेत्याच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. परंतु , नुकतंच समोर आलेल्या ETimes च्या रिपोर्टनुसार, हृतिक आणि सबाची भेट कोणत्याही कॉमन फ्रेंडद्वारे नाही तर ट्विटरद्वारे झाल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा:
VIDEO:हर्ष लिंबाचियाला होतोय भारती सिंहसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, केला खुलासा
) रिपोर्टनुसार, असा दावा करण्यात आला आहे की, ‘काही महिन्यांपूर्वी हृतिक रोशनने एक व्हिडिओ लाइक आणि शेअर केला होता. ज्यामध्ये सबा आझाद होती.त्यामुळे सबाने थेट मेसेजद्वारे ह्रतिकचे आभार मानले होते. आणि त्यानंतर दोघांनी बोलणे सुरू केले होते.रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की हृतिक आणि सबा गोव्यामध्ये सीक्रेट हॉलिडेसाठी गेले होते. परंतु या दोन्ही कलाकारांनी आपल्या नात्याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.