या अगोदर 83 सिनेमातील सर्व कलाकरांचे फर्स्ट लुक समोर आले होते. पण दीपिका या सिनेमात रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत असल्यानं तिच्या फर्स्ट लुकविषयी सर्वांना उत्सुकता होती. या फोटोमध्ये दीपिका शॉर्ट हेअर फुलनेक ब्लॅक टीशर्टमध्ये दिसत असून तिनं रणवीरचा हात पकडला आहे. 1983 मधील भारतीय क्रिकेट संघानं साकारलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला ‘83’ हा सिनेमा 10 एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमर सिंह यांची मृत्यूशी झुंज, अंथरुणाला खिळलेले असताना मागितली अमिताभ यांची माफी
दीपिकाला एवढ्या चांगल्या भूमिका ऑफर होत असताना तिनं एवढी छोटीशी भूमिका साकारण्यासाठी का तयार झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार दीपिकानं हा सिनेमा दोन कारणांसाठी साइन केला आहे. पहिलं कारण रणवीर आहे आणि दुसरं कारण म्हणजे या सिनेमासाठी दीपिकाला मोठी रक्कम मानधन मिळत आहे.
‘83’ सिनेमाच्या संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका या सिनेमाविषयी दोन बाजूनी विचार करत होती. सहाय्यक भूमिका करावी की नाही याबद्दल तिला शंका होती. पण अखेर तिनं हा सिनेमा स्वीकारला. यामागे कदाचित रणवीर किंवा तिला या सिनेमासाठी मिळत असलेलं मानधन असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिकानं या सिनेमात रोमी भाटिया यांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 14 कोटींचं मानधन घेतलं आहे. सिद्धार्थबद्दल वक्तव्य करणं शिल्पाच्या अंगलट, फॅन्स शिल्पावर भडकले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Deepika padukone, Ranveer singh