Home /News /entertainment /

परिस्थिती भीतीदायक असतानाही लेकीला खळखळून हसवतोय बाप, मन हेलावणारा VIDEO

परिस्थिती भीतीदायक असतानाही लेकीला खळखळून हसवतोय बाप, मन हेलावणारा VIDEO

आजुबाजुला बॉम्बस्फोट होत असताना मुलीला भीती वाटू नये म्हणून तिला हसवणाऱ्या बापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी गमतीशीर तर कधी गंभीर असे व्हिडिओ असतात. कधी काय चर्चेत येईल हे सांगता येत नाही. आता एका बॉलीवूड अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून अंगावर शहारे आणणारा आहे. जीशान आयुबने शेअर केलेला व्हिडिओ हा सिरियातली आहे. यात एक बाप आपल्या मुलीला बॉम्बस्फोटाची भीती वाटू नये म्हणून हसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. सिरियातील या व्हिडिओला शेअर करताना जीशानने म्हटलं की, हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. तसंच ज्या युजरने हा व्हिडिओ आधी शेअर केला आहे त्याने माहितीसुद्धा शेअर केली आहे. किती दु:खी जग आहे. चार वर्षांच्या चिमुकलीला गुंतवून ठेवण्यासाठी बापाने केलेला प्रयत्न. सिरियात होत असलेल्या बॉम्बस्फोटामुळे मुलीला भीती वाटू नये म्हणून प्रत्येकवेळी तिला हसवण्याचा प्रयत्न बाप करत आहे. या व्हिडिओमध्ये बॉम्बस्फोटाचा आवाज येताच बाप-लेक मोठ्याने हसत असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जीशान आयुबने आतापर्यंत आर्टिकल 15 आणि मिशन मंगल चित्रपटात अभिनय केला आहे. याशिवाय रईस, तनु वेड्स मनु, मणिकर्णिका, ट्यूबलाइट, झीरो आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटातही काम केलं आहे. जीशानने शेअर केलेल्या व्हिडिओमुळं 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या लाइफ इज ब्युटिफुल या चित्रपटाची आठवण होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या तावडीत सापडलेल्या कुटुंबाची कहाणी यात चित्रित कऱण्यात आली आहे. यामध्ये एका व्यक्तीला त्याच्या लहान मुलासोबत कॉन्सनट्रेशन कॅम्पमध्ये धाडण्यात येतं. तिथं सुरु असलेला छळ हा एक खेळ असल्याचं ती व्यक्ती मुलाला सांगत असते. तिथल्या वातावरणाचा अंदाज मुलाला येऊ नये यासाठी शेवटपर्यंत ती व्यक्ती करते. वाचा : सिद्धार्थबद्दल वक्तव्य करणं शिल्पाच्या अंगलट, फॅन्स शिल्पावर भडकले
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या