‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता...’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया

‘एकदा तरी तिने मला कॉल करायचा होता...’ जेव्हा दीपिका पदुकोणने रणबीरला म्हटलं होतं विश्वासघाती, त्याने दिली होती ही प्रतिक्रिया

मी त्याला नेहमीच दुसरी संधी दिली आणि तो मला मुर्ख बनवत गेला. त्यावेळी प्रत्येकजण मला सांगत होता की तो अस्थिर आहे. मी स्वतः त्याला अनेकदा पकडलं आहे.

  • Share this:

मुंबई, २७ एप्रिल- बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण ही जोडी प्रेक्षकांना ऑनस्क्रीन जेवढी पसंत आहे तेवढीच ऑफस्क्रीनही आवडते. आजही दोघांना एकत्र पाहण्याची अनेकजण मागणी करत असतात. दीपिकाने रणवीर सिंगशी लग्न केलं असलं तरी या दोघांच्या चाहत्यांमध्ये तसूभरही परिणाम झालेला नाही. दोघांनी ब्रेकअपनंतरही आपलं मैत्रीचं नातं टिकवून ठेवलं.

आता दोघांमध्ये सगळं काही सुरळीच असलं तरी जेव्हा दीपिका- रणबीरचं ब्रेकअप झालं तेव्हा मात्र स्थिती वेगळी होती. दीपिकाने प्रसारमाध्यमांसमोर दोघांच्या ब्रेकअपची कबूली दिली होती. यानंतरच दोघं वेगळे झाले होते.

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर, पूर्व पत्नी मेहर जेसियानं दिली 'ही' प्रतिक्रिया

तर अभिनेता रणबीर कपूरने एका टीव्ही शोमध्ये आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ‘सार्वजनिक ठिकाणी याबद्दल बोलण्यापेक्षा तिने मला एक फोन करायला हवा होता. दीपिकाचा माझ्यावर फार राग होता. तिने मला एकदा तरी कॉल करायला हवा होता. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी असं वक्तव्य देण्यापेक्षा तिने फोन उचलून मला कॉल करायला हवा होता.’

दीपिका पदुकोण आणि अमृता रावमध्ये आहे 'हे' नातं, फॅमिली फंक्शनमध्ये दिसले एकत्र

दीपिकाने रणबीरसोबतच्या ब्रेकअपबद्दल रेडीफला सांगताना म्हटलं की, ‘हो.. तेव्हा मी फार चिडले होते.. माझ्या मनात प्रचंड राग होता.. मला वाटतं की अशा परिस्थितीत प्रत्येक मुलगी तशीच वागली असती. आमच्याबद्दल तेव्हा खूप काही लिहिलं जात होतं. खासगी आयुष्यवरही रकानेच्या रकाने लिहिले जात होते. पण आज आम्ही ते सर्व काही सोडलं आहे आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज आम्ही दोघंही आनंदी आहोत आणि समोरा समोर आलो तरी आमच्यात सहजता असते. सरते शेवटी याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.’

…म्हणून एवेंजर्स सिनेमा संपण्याच्याआधीच थिएटरमधून बाहेर पडले सुशांत सिंग राजपूत

अभिनेत्रीने स्वतः सांगितले होते की तिने रणबीर आणि कतरिनाला ‘रंगे हाथ’ पकडलं होतं. दीपिका म्हणाली की, ‘माझ्यासाठी सेक्स ही फक्त शारीरिक गोष्ट नसून ती एक भावनिकही आहे. मी नात्यात असताना कोणाची कधी फसवणूक केली नाही. जर मला असं करायचं असेल तर मी रिलेशनशिपमध्येच का रहावं? त्यापेक्षा एकटं राहणंच चांगल. मजा करा... मस्ती करा... पण सारेच असा विचार करत नाहीत. म्हणूनच कदाचित भूतकाळात मला दुःख मिळालं. माझं मन दुखावलं गेलं. मी त्याला नेहमीच दुसरी संधी दिली आणि तो मला मुर्ख बनवत गेला. त्यावेळी प्रत्येकजण मला सांगत होता की तो अस्थिर आहे. मी स्वतः त्याला अनेकदा पकडलं आहे. यानंतर मी माझं मन घट्ट केलं आणि निर्णय घेतला.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 12:25 PM IST

ताज्या बातम्या