जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर, पूर्व पत्नी मेहर जेसियानं दिली 'ही' प्रतिक्रिया

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर, पूर्व पत्नी मेहर जेसियानं दिली 'ही' प्रतिक्रिया

अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गरोदर, पूर्व पत्नी मेहर जेसियानं दिली 'ही' प्रतिक्रिया

मेहर एक चांगली आई असून तिला आपल्या मुलींच्या भविष्यासाठी योग्य असलेली प्रत्येक गोष्ट करायची आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 27 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून त्याच्या गर्लफ्रेंडच्या प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिली होती. वयाच्या 44व्या वर्षी अर्जुन तिसऱ्यांदा बाबा बनणार आहे. पहिल्या पत्नीपासून अर्जुनला 2 मुली आहेत. अर्जुननं ही गोड बातमी शेअर केल्यानंतर त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र आता अर्जुनची पहिली पत्नी मेहर जेसियानंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मेहेरच्या एका जवळच्या व्यक्तीनं तिच्या प्रतिक्रियेबाबत मुंबई मिररला माहिती दिली.

    जाहिरात

    मुंबई मिररच्या वृत्तानुसार, मेहरला अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या प्रेग्नन्सीविषयी काहीच समस्या नाही. तिनं ही गोष्ट स्वीकारली आहे की, अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. मेहर एक चांगली आई आहे आणि तिला आपल्या मुलींच्या भविष्यासाठी योग्य असलेली प्रत्येक गोष्ट करायची आहे. Avengers Endgame पाहायला जाणार असाल तर जाणून घ्या काय आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया गर्लफ्रेंडच्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांशी शेअर केल्यानंतर अर्जुन त्याच्या दोन्ही मुली मिहिका आणि मायरासोबत डिनरसाठी गेलेला असताना कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी त्या तिघांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळालं. यावरून अर्जुनच्या मुलीसुद्धा त्याच्या या निर्णयावर खूश असल्याचा अंदाज लावला जात आहे.

    अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही एक साउथ आफ्रिकन मॉडेल आहे. तिनं 2009मध्ये मिस इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेतला होता. तसेच तिचा सामावेश जगातील 100 मादक महिलांमध्ये करण्यात आला. पण ‘मिस IPL बॉलिवूड’ बनल्यावर तिला खरी ओळख मिळाली. पहिली पत्नी मेहरपासून वेगळे झाल्यावर अर्जुन आणि गॅब्रिएला याची भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा बराच काळ चालल्या होत्या.

    ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमासमोरील अडचणी कायम, बंदी हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात