मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Diwali 2022: दिवाळी पार्ट्यांमधून दीपिका-रणवीर गायब; पुन्हा विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण

Diwali 2022: दिवाळी पार्ट्यांमधून दीपिका-रणवीर गायब; पुन्हा विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण

रणवीर-दीपिका

रणवीर-दीपिका

क्रिती सेननपासून ते मनीष मल्होत्रापर्यंत मोठमोठे सेलिब्रेटी पार्ट्यांचं आयोजन करत आहेत. यामध्ये अनेक मोठमोठे कलाकार ट्रॅडिशनल लुकमध्ये सहभागी होत आहेत. मात्र रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यावेळी बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांमध्ये दिसले नाहीत.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 23 ऑक्टोबर-   सध्या देशभरात दिवाळीची धूम सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण दिवाळीच्या तयारीत व्यग्र आहेत. शॉपिंग, फराळ,फटाके, रांगोळी, सजावट अशा सर्व बाबींकडे प्रत्येकजण बारकाईने लक्ष देत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटी दिवाळी पार्टी करण्यात मग्न आहेत. क्रिती सेननपासून ते मनीष मल्होत्रापर्यंत मोठमोठे सेलिब्रेटी पार्ट्यांचं आयोजन करत आहेत. यामध्ये अनेक मोठमोठे कलाकार ट्रॅडिशनल लुकमध्ये सहभागी होत आहेत. मात्र रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यावेळी बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांमध्ये दिसले नाहीत. बॉलिवूडचे सर्वाधिक प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असणाऱ्या दीपिका आणि रणवीर पार्ट्यांमध्ये दिसले नाहीत हे चाहत्यांना विचित्र वाटत आहे. दरम्यान कतरिना कैफ-विकी कौशलपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनपर्यंत अनेक जोडपी मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला उपस्थित होते. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड पार्ट्या असो किंवा कोणताही पुरस्कार सोहळा रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नेहमीच या कार्यक्रमांचे आकर्षण ठरतात. परंतु यंदाच्या कोणत्याच दिवाळी पार्टीत रणवीर आणि दीपिका दिसून आले नाहीत. चाहते रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला खूप मिस करत आहेत. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर त्याच्या कामाच्या वचनबद्धतेमुळे सतत विदेश दौरे करत आहे. तर दीपिका पादुकोण काही काळ विश्रांती घेत आहे. आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. तिला कोणत्याच पार्टीत एकटी जायची इच्छा नसल्याने ती पार्ट्यांपासून दूर राहिली असल्याचं या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

(हे वाचा:Malaika Arora B'day: मलायकाच्या बर्थडेला रोमँटिक झाला अर्जुन कपूर; मिरर सेल्फी शेअर करत लिहलं असं काही... )

दरम्यान एका वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना निराश केलं होतं. ती अफवा इतर कोणती नसून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या ब्रेकअपची होती. या दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचं अजूनही अनेकांना वाटतं. परंतु असं काही नसल्याचं अनेक रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. दीपिका पादुकोणला सहसा तिच्या पालकांसोबत बंगलोरमध्ये सण साजरे करायला आवडतात. तथापि, ती तिच्या लग्नानंतर बंगलोरला सहसा जाऊ शकत नाही. त्यामुळे ती पती रणवीर सिंग आणि सासरच्यांसोबत दिवाळी साजरी करताना दिसते. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार असं सांगण्यात येत आहे की, रणवीर आणि दीपिका एकत्र दिवाळी साजरी करतील. मुंबई असो किंवा बेंगलोर ते दोघे सणाला एकत्र असतील. सणासुदीच्या दिवशी रणवीर पत्नीपासून दूर राहणार नाही आणि सणापूर्वी त्याची सर्व कामे पूर्ण करेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दीपिका पादुकोण यावर्षी दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कोणत्याच सणाचा मनमोकळेपणाने आनंद घेता आला नव्हता. परंतु यंदाचं वर्ष सर्वांसाठीच खास असणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Deepika padukone, Diwali, Entertainment, Ranvir singh