दिवाळी आली असून सगळीकडे दिवाळीची धूम पहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्ये तर जंगी दिवाळी पार्टी सुरु आहे. अनेक कलाकार दिवाळी पार्टी होस्ट करत आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीत सणासुदीचा हंगाम जोरात सुरू असून पंगा क्वीन अभिनेत्री कंगना राणौतचा दिवाळी पार्टी लुक समोर आला आहे.
कंगनाने नुकतीच निर्माती एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी कंगना एथनिक लुकमध्ये पहायला मिळाली.
कंगना राणौतने तिच्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- फेस्टिव्ह मूड. त्यामुळे दिवाळीनिमित्तानं कंगनाचे अजून घायाळ करणारे लुक आपल्याला पहायला मिळणार आहे.
कंगना राणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे तिचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.