जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Malaika Arora B'day: मलायकाच्या बर्थडेला रोमँटिक झाला अर्जुन कपूर; मिरर सेल्फी शेअर करत लिहलं असं काही...

Malaika Arora B'day: मलायकाच्या बर्थडेला रोमँटिक झाला अर्जुन कपूर; मिरर सेल्फी शेअर करत लिहलं असं काही...

मलायका अरोरा

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल म्हणून मलायका अरोराला ओळखलं जातं. आज मलायका अरोरा आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑक्टोबर-  बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्री, डान्सर आणि मॉडेल म्हणून मलायका अरोराला ओळखलं जातं. आज मलायका अरोरा आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही मलायका अतिशय फिट आणि सुंदर दिसते. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर मलायकावर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान सर्वांचं लक्ष मलायकाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरकडे लागून होतं. अर्जुन कपूरने सर्वप्रथम मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मलायकासोबतचा मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा एक रोमँटिक फोटो आहे. या फोटोसोबत अर्जुनने गर्लफ्रेंड बर्थडे गर्लसाठी एक लव्ह नोटही लिहिली आहे. मलायका आणि अर्जुन जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर आपलं नातं ऑफिशियल केलं आहे. अर्जुन कपूर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. तो इंस्टाग्रामवर बराच सक्रिय असतो. अर्जुन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो सतत आपल्या सोशल मीडियावर लक्षवेधी पोस्ट करत असतो. अर्जुन बऱ्याचवेळा मलायकासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतो. अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टला चाहतेच नव्हे तर सेलेब्रेटींकडूनही भरभरुन दाद मिळत असते. सोबतच अर्जुन मलायकासोबत सतत विदेशात सुट्टीचा आनंद लुटताना दिसून येतो. त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांना या जोडीबाबत लहान-लहान अपडेट्स जाणून घ्यायला प्रचंड आवडतं. त्यामुळे या दोघांच्या सोशल मीडियावर सर्वांचं बारकाईने लक्ष असतं. **(हे वाचा:** Malaika Arora B’day: मॉडेल-अभिनेत्री नव्हे तर मलायकाला ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर; वाचून बसणार नाही विश्वास ) अर्जुन कपूरने काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक अतिशय रोमँटिक मिरर सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत आहे.हा रोमँटिक फोटो शेअर करत अर्जुन कपूरने कॅप्शनमध्ये लिहलंय, “द यिन टू माय यंग… हॅप्पी बर्थडे बेबी… तू जशी आहेस तशीच राहा, आनंदी राहा, नेहमी माझी राहा…” यासोबतच अर्जुनने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेक इमोजींचा समावेश केला आहे. अर्जुनच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जाहिरात

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेयर्सच्या बातम्या काही वर्षांपूर्वी सतत सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. ते दोघेही सतत एकमेकांसोबत दिसून येत होते. परंतु या दोघांनी आपलं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. 2019 मध्ये अर्जुनच्या 34 व्या वाढदिवसाला दोघांनीही इन्स्टाग्रामवर आपलं नातं ऑफिशियल केलं होतं. त्यावेळी मलायकाने आपल्या इन्स्टा पोस्टवर अर्जुनसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. त्या नंतर ते सतत आपले रोमँटिक फोटो शेअर करत एकेमकांबाबतचं प्रेम व्यक्त करत असतात.

News18लोकमत
News18लोकमत

बर्थडे गर्ल मलायका अरोराने यापूर्वी सलमान खानचा भाऊ अभिनेता-निर्माता अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. या दोघांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला आहे. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगादेखील आहे. तर अर्जुन कपूरने यापूर्वी सलमान खानची बहीण अर्पिता खानला डेट केलं आहे. सध्या मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज खान विदेशी मॉडेल जॉर्जियानी अँड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात