मुंबई, 14 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान 4 वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहरुख आमि दीपिका यांचा पठाण हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर आणि काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्याआघीच पठाण बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अशातच सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिका आणि शाहरुख यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. दीपिकाच्या बोल्डनेसनं सर्वांना खिळवून ठेवलं आहे. पठाण बायकॉट करण्याची मागणी सुरू होत असताना आता त्यात सिनेमातील गाण्यामुळे आणखी एक वाद निर्माण झाला आहे. गाण्यात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरून आक्षेप घेण्यात आला आहे. दीपिका पादुकोणच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी पठाणमध्ये तिनं सर्वाधिक बोल्ड सीन्स दिल्याचं म्हटलं जात आहे. दीपिकाला तिच्या बोल्ड सीन्स मुळे ट्रोल केलं जात असताना आता तिच्या बिकिनीच्या रंगावरूनही मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बेशरम रंग गाण्यात दीपिकानं भगल्या रंगाचा बिकिनी ड्रेस घातला आहे. या ड्रेसच्या हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी आक्षेप नोंदवला आहे. भगव्या रंगाचे कपडे अश्लिल पद्धतीने घातले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पठाण सिनेमात भगव्या रंगाचा झालेला अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा - shah rukh khan: ‘पठाण’चं पोस्टर रिलीज झाल्यावर शाहरुखचे चाहते नाराज; नेमकं काय आहे कारण?
त्यांनी पुढे म्हटलंय, ‘बॉलिवूड सनातन धर्माविरोधात काम करत आहेत. हा भगव्याचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे. ज्या भगव्यानं देशाला आणि जगाला दिशा दिली त्या भगव्याला गाण्यामध्ये बेशरम म्हणण्यात आलं आहे. सेन्सॉर बोर्डानं हे गाणं पास करणं हा हिंदू सनातन धर्माचा अपमान आहे’. या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी चक्रपाणी महाजाराजांनी हिंदू समाजाला केली आहे.
हिंदू महासभेप्रमाणेच मध्य प्रदेशचे मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही गाण्याला विरोध केला आहे. गाण्यात दाखवण्यात आलेली काही दृश्य बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. असं केल्यास सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी म्हटलंय, गाण्यात टुकडे टुकडे गँगची समर्थक दीपिका हिने घालेले कपडे फार आक्षेपार्ह आहेत. हे गाणं दूषित मानसिकतेने बनवण्यात आलं आहे.