मुंबई 25 जुलै: 2023 वर्षच बॉलिवूडच्या किंग खान साठी फारच खास वर्ष असणार आहे. किंग खान पुढच्या वर्षात धमक्यात कमबॅक करत असून त्याच्या पठाण सिनेमाची सगळीकडेच उत्सुकता दिसत आहे. या सिनेमाशी निगडित अजून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण सुद्धा एका धमाकेदार अंदाजात दिसून येणार आहे. दीपिकाचं पात्र दाखवणारा एक नवा टिझरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये दीपिका एकाच गोळीने ठार करायला सज्ज असल्याचं दिसत आहे. दीपिकाचा हा फायरने भरलेला अंदाज याआधी समोर आला नसल्याने दीपिकाच्या भूमिकेची खूपच चर्चा होताना दिसत आहे. खुद्द शाहरुखने सुद्धा दीपिकाच्या (deepika padukone in pathaan) पात्राची ओळख करून देत सोशल मीडियावर लिहिलं की, “तिला केवळ गोळीने घायाळ करायची गरज नाही.” दीपिका या सिनेमाच्या पोस्टरमध्ये हातातली बंदूक रोखून ठेवत डोळ्यात आत्मविश्वास ठेवत उभी असताना दिसत आहे. किंग खान आणि दीपिका पदुकोण यांच्या जोडीने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. दीपिकाच्या करिअरची सुरुवात सुद्धा शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’ सिनेमाने झाली होती. तसंच चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाने सुद्धा या जोडीचा वेगळा अंदाज समोर आला होता. शाहरुख येत्या काळात पुन्हा एकदा दीपिकासोबत दिसून येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढताना दिसत आहे.
दीपिका तिच्या इतर भूमिकांपेक्षा एका वेगळ्या अंदाजात दिसून येणार आहे. दीपिकाच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत आता हा ऍक्शनने परिपूर्ण सिनेमात ती नेमकी कशा भूमिकेत दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे ही वाचा- Salman Khan : कथित गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला सलमानने लावली खास हजेरी, पाहा VIDEO शाहरुखच्या पठाण सिनेमाला रिलीज व्हायला सहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या दिवसाचं औचित्य साधत दीपिकाच्या पात्राची झलक आज प्रेक्षकांसमोर रिलीज झाली आहे. दीपिकाचा या सिनेमातील वावर आणि तिची भूमिका सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. तिच्या या पात्राची झलक पाहून चाहत्यांचे सुद्धा डोळे दिपून गेल्याची भावना समोर येत आहे. शाहरुखचा हा कमबॅक सिनेमा धुमधडाक्यात रिलीज व्हायला सज्ज आहे असंच आता म्हणावं लागेल.