मुंबई, 25 जुलै : आपल्या खासगी आणि वैयक्तिक जीवनामुळेही अनेकदा वादात सापडलेला भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan and Rumoured girlfriend iulia vantur) . सलमान खान अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतो. अशातच भाईजान पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी तो त्याच्या कथित एक्स गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. एक्स गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला हजेरी लावल्यानं सलमान खान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याशिवाय वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पहायला मिळत आहे. सलमानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरनं नुकताच तिचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. तिच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्मा, गायिका पायल देव, सलमानचा बॉडिगार्ड शेरा उपस्थित होते. वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ युलियानं तिच्या इमन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अगदी काही वेळातच तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पहायला मिळाला. याशिवाय तिच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.
युलिानं व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, मी आज खूप आनंदी आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, खूप प्रेम करणारी लोक माझ्या आयुष्यात आहे. माझा वाढदिवस खास बनवण्यासाठी सगळ्यांचे आभार. तुमचे मेसेज, प्रेम, शुभेच्छा, तुमचा सततचा पाठिंबा, या सगळ्यांसाठी धन्यवाद.
सलमानचा मेहुणा आयुषनंही त्याच्या सोशल मीडियालवर ग्रुपफोटो शेअर केलेला पहायला मिळाला. युलियाच्या खास दिवशी सलमान उपस्थित असल्यानं चर्चा तर होणारच. त्यामुळे सलमान आणि युलियाच्या चर्चां सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहे. सलमान आणि युलियानाच्या रिलेशनशिपच्या चर्चा जरी होत असल्या तरी याविषयी दोघांनीही काही अधिकृतरित्या सांगितलेलं नाहीये. त्यामुळे दोघांची गोष्ट लग्नापर्यंत पोहचणार का?, असा प्रश्न चाहते वारंवार विचारताना दिसतात. यावर मात्र दोघांनीही मौन बाळगलं आहे.