फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम सामना सुरू आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम फेरीचे भव्य उद्घाटन पार पडले. ऐतिहासिक सामन्यासाठी बॉलिवूडकरही ग्लॅमरस तडका लावण्यासाठी हजर होते. फिफा वर्ल्ड कपच्या भव्य उद्धाटनवेळी दीपिका पादुकोण उपस्थित होती. दीपिका पदुकोणने अंतिम फेरीपूर्वी विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण केले. दीपिका पदुकोण फिफा विश्वचषक ट्रॉफीसोबत पोज देताना दिसली. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये दीपिकाच्या चेहऱ्यावरील ग्लो आणि क्लासी लूकने चाहत्यांची मने जिंकली. पठाण वादादरम्यान दीपिका फिफा वर्ल्ड कप मॅच पाहण्यासाठी पोहचल्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.