मुंबई, 06 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोण मागच्या काही दिवसांपासून छपाक सिनेमाच्या प्रमोशनात बीझी आहे. दीपिकानं नुकताच तिचा वाढदिवस लखनऊमधील अॅसिड हल्ला पिडीत मुलींसोबत साजरा केला. सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीर ही एक पॉवरफुल जोडी मानली जाते. या जोडीनं त्यांच्या अभिनयानंच नाही तर त्यांच्या रोजच्या वागण्यातूनही त्यांनी सर्वांची मनं जिंकली. मॅरिड लाइफसोबतच दीपिका सध्या तिचं प्रोपोशनल लाइफही हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दीपिकानं सलमान खानसोबत अद्याप एकही सिनेमा केलेला नाही त्यामुळे येत्या काळात हे दोघंही एकत्र येतील का याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. लवकरच दीपिका गली बॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत एका सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमाचं नाव अद्याप समजलेलं नसलं तरीही या सिनेमात अनन्या पांडे सुद्धा दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप
दरम्यान छपाक सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तिला एका पत्रकारानं प्रेग्नन्सीविषयी प्रश्न विचारला. यावर दीपिका भडकलेली दिसली. ती म्हणाली, मी तुम्हाला प्रेग्नन्ट दिसते का? मी तुम्हाला विचारावं का की मी याचं प्लानिंग कधी करावं? जर तुम्ही याला परवानगी दिली तरच मी याची तयारी करावी. त्यानंतर काही वेळ थांबून ती पुन्हा म्हणाली, मी प्रेग्नन्ट असेल तर, नऊ महिने आहेत तुम्ही पाहाल. VIDEO : नेहा पेंडसेनं लग्नात घेतला असा भन्नाट उखाणा की, ऐकून नवराही लाजला
यापूर्वीही दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या अफवा उठल्या होत्या. मात्र यावर प्रत्येक वेळी दीपिकानं मजेदार उत्तरं दिली होती. ‘छपाक’ सिनेमा त्याच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. शूटिंग दरम्यान या सिनेमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते तसेच दीपिका सुद्धा अनेकदा दिल्लीमध्ये सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं असून हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच दिवशी अजय देवगणचा ‘तानाजी’ सिनेमा सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. ‘Bigg Boss च्या घरात भांडी घासण्यासाठी सलमाननं घेतले 600 कोटी’