मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप, मुंबईच्या हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं

बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप, मुंबईच्या हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं

लॉकडाऊनमध्ये पैसे कमवायचा हाच मार्ग होता असंही यामधील एका आरोपीने सांगितलं.

लॉकडाऊनमध्ये पैसे कमवायचा हाच मार्ग होता असंही यामधील एका आरोपीने सांगितलं.

बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन मॅनेजरला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 06 जानेवारी : बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन मॅनेजरला सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबईतील जुहू भागात एका 4 स्टार हॉटेलमध्ये रेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. शनिवारी याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर झेड लक्झरी रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी प्रॉडक्शन मॅनेजर राजेशकुमार लाल याला अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात उज्बेकिस्तानच्या दोन मुलींना या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं. यापूर्वी 23 डिसेंबरला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अशाच न महिलांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी सांगितलं की त्यांना या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

धक्कादायक! थर्टीफर्स्टला केलं प्रपोज आणि 5 दिवसातच गर्लफ्रेंडला घातल्या गोळ्या

पोलिसांनी या हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात झरीना नावाची एका परदेशी महिला राजेशकुमार लाल याच्या मदतीनं बाहेरच्या देशातून सेक्स रॅकेट चालवत आहे. ही महिलाच तिथल्या परदेशी महिलांना या हॉटेलमध्ये पाठवते. त्या बदल्यात तिला प्रति ग्राहक 80 हजार रुपये मिळातात. राजेशकुमार लाल हा बॉलिवूडशी संबंधित असल्यानं या घटनेनंतर सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश

याशिवाय मुंबई शहरात बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मधून मुलींना आणून त्यांना वेश्या व्यवसायात टाकून आर्थिक फायदा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखे तर्फे करण्यात आलाय. मात्र ह्या रॅकेट मागे कोण कोण आहेत ह्याचा शोध सुरू आहे. मुंबई हे अंतरराष्ट्रीय दर्जेचा शहर असला तरी मात्र ह्या शहरात अनधिकृत कामं सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा अनेक वेळा समोर आलेलं आहे. असाच एक प्रकार समोर आहे ज्यामध्ये दलालांमार्फत भारतात पश्चिम बंगाल आणि बांगलादेश ह्या देशातून मुलींना मुंबईत आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलला जात असल्याचा समोर आलं आहे. गुन्हे शाखे तर्फे दहिसरच्या गिरी निवास रावळपाडा दहिसर पूर्व मधून तीन मुलींची सुटका करण्यात आली असून संजय गोविंदास नावाच्या एका दलालाला अटक करण्यात आलीय.

पॉर्न पाहाताना तुमचा VIDEO होऊ शकतो रेकॉर्ड?

तो या सर्व प्रकाराचा सूत्रधार होता. ह्या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली होती की दहिसरच्या रावळपाडा मध्ये मानवी तस्करीचं रॅकेट आहे. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे तीन मुली आढळून आल्यात. त्यात एक तरुणी ही पश्चिम बंगालची असल्याचं आढळून आलंय.

तर दुसरी मुलगी ही बांगला देशाची नागरीक असल्याचं निष्पन्न झालं. तिच्याकडे बांगलादेशचा पासपोर्ट आणि व्हिसा मिळून आलाय. ह्या सर्व मुलीकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचं स्पष्ट झालंय.

पार्टीतून कारने घरी निघाली महिला, ड्रायव्हरने तिच्याच फ्लॅटमध्ये केला बलात्कार

हा सर्व प्रकार परदेशी मुलींची तस्करी आणि वेश्या व्यवसायाशी निगडित असल्याने नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई सुरू आहे आरोपी दलालाला अटक करून ह्या रॅकेट मध्ये इतर कोण कोण आहे ह्याचा शोध सध्या गुन्हे शाखे मार्फत सुरू आहे.

First published:

Tags: Bollywood