मुंबई, 06 जानेवारी : टीव्ही रिअलिटी शो बिग बॉसमधून हिमांशी खुराना बाहेर पडली. या शोमध्ये तिनं वाइल्ड कार्ड एंट्री घेतली होती. मात्र तिचा या शोमधील प्रवास फारच लहान राहिला. दरम्यान शोमध्ये तिची आसिम रियाजशी जवळीक वाढलेली दिसून आली. यावेळी आसिमनं तर त्याचा प्रेमाची कबुली सुद्धा दिली होती. मात्र हिमांशीनं त्याला फक्त मित्र मानत असल्याचं सांगत तिचा साखरपुडा झाला असल्याचं म्हटलं. त्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर होस्ट सलमान खान बद्दल हिमांशीनं एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. बिग बॉसच्या घरात सलमान खाननं भांडी घासली याला हिमांशी खुरानानं फक्त ड्रामा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असं करण्यासाठी त्याला 600 कोटी मिळाल्याचाही दावा तिनं केला आहे. मागच्या आठवड्यात घरात वाद झाल्यानंतर सर्वांनीच त्यांची ड्यूटी करण्यास नकार दिला त्यानंतर सलमाननं घरात जाऊन साफसफाई केली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला होता. घरातील भांडी घासणे झाडू मारणे ते अगदी टॉयलेटची सफाई सुद्धा सलमान करताना दिसला. सलमानच्या या कृतीवर आता हिमांशीनं निशाणा साधला आहे.
कंगना रणौतनं आता घेतला सलमानशी ‘पंगा’, दबंग खान ओरडून म्हणाला…
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात हिमांशी खुराना एका सलूनमध्ये बसलेली असून तिच्या फ्रेंड्ससोबत बिग बॉस बद्दल चर्चा करताना दिसत आहे. यावेळी तिला तिचा मित्र विचारतो सलमाननं मागच्या आठवड्यात घरात भांडी घासली. ड्रामा चांगला होता. त्यावर हिमांशी बोलते यासाठी त्याला 600 कोटी मिळाले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याशिवाय बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतरही हिमांशी आसिम रियाजला पाठिंबा देताना दिसली. ज्यामुळे तिची सोशल मीडियावर खूप चर्चा सुद्धा होत आहे.
या आठवड्याच्या विकेंड का वारमध्ये सलमाननं आसिमला चांगलंच सुनावलं मात्र सलमानचं असं करणं आसिमच्या चाहत्यांना मात्र आवडलेलं नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर #ViewersChoiceAsim हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. त्यात हिमांशीनंही ट्विट करुन आसिमला पाठिंबा दिला. ट्विटमध्ये तिनं, मला तुझा अभिमान वाटतो. मी नेहमीच तुझ्या बाजूनं उभी असेन असं तिनं लिहिलं. कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नीनं केला धक्कादायक खुलासा किंग खाननं केली होती एवढी मोठी चोरी? सलमाननं केली शाहरुखची पोलखोल